मुंबई : बॅड बॉय (Bad Boy)सिनेमाच्या आश्वासक टीझरनंतर, ट्रेलरची (Trailer) उत्सुकता सगळ्यांना होती. चित्रपटाच्या ट्रेलरच्या आधी, नमाशी चक्रवर्ती (Namashi chakraborty) आधीच चर्चेत आहे आणि एक अभिनेता आहे ज्याला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. नमाशी चक्रवर्ती अभिनेते मिथुन चक्रवरर्तीचा (Mithun chakraborty) मुलगा आहे.  नमाशीच्या बॅड बॉयचा ट्रेलर (Bad Boy Movie Trailer )नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सिनेमाच्या कथेने सर्वांचं मनोरंजन करणार असल्याचं समजतंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नमाशीने सोशल मीडियावर कॅप्शनसह बातमी शेअर केली, ''बॅड बॉय थिएटरचा ट्रेलर आला आहे''. हा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येताच प्रेक्षकांनी ट्रेलरला डोक्यावर घेतलं आहे. अवघ्या काही वेळातच या ट्रेलरचा सगळीकडे बोलबोला आहे. नामीशीला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते कमालीचे उत्सुक आहेत. 


 ट्रेलर प्ले करताच नमाशी ची रोमँटिक एंट्री आहे आणि जसजसा ट्रेलर पुढे जातो तसतसे आपल्याला नमाशी त्याच्या अभिनयाच्या वेगळ्या छटा पहायला मिळतात. बॅड बॉयच्या ट्रेलरमध्ये नमाशी खऱ्या अर्थाने ‘रॉकिंग बॉय’ आहे. त्याने अपेक्षेपेक्षा चांगला अभिनय केला आहे. ट्रेलर कॉमेडी, अॅक्शन आणि रोमान्सच्या यांचा मेळ असलेला रोम-कॉम चित्रपट आहे.


नमाशी चक्रवर्ती आणि अमरीन यांच्या व्यतिरिक्त या चित्रपटात जॉनी लीव्हर, सास्वता चॅटर्जी, राजपाल यादव, राजेश शर्मा आणि दर्शन जरीवाला यांच्याही भूमिका आहेत. इनबॉक्स पिक्चर्स, बॅनरखाली अंजुम कुरेशी आणि साजिद कुरेशी निर्मित 'बॅड बॉय'. राजकुमार संतोषी यांनी दिग्दर्शित केला आहे. बॅड बॉय 28 एप्रिल 2023 रोजी रिलीज होणार आहे


नमाशीने आपल्या बॉलीवूड करिअरची सुरुवात आर्टिकल 15 या चित्रपटातून केली होती, ज्यामध्ये त्यांनी एक छोटी भूमिका साकारली होती. भारतीय बॉलिवूड चित्रपट अभिनेता, प्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा नामाशी त्याच्या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. नमाशी आगामी बॅड बॉय या चित्रपटातून अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. 



नमाशीचा जन्म ४ सप्टेंबर १९९२ रोजी मुंबईत झाला. त्याने तामिळनाडूच्या मोनार्क इंटरनॅशनल स्कूलमधून शालेय शिक्षण घेतलं, नंतर तिने तिच्या अभिनय आणि नृत्य कौशल्यासाठी शिमक दावर संस्थेत शिक्षण घेतलं.