मुंबई : सलमान खानचा सिनेमा 'वीर'चे प्रोड्यूसर विजय गिलानी यांचं बुधवारी रात्री निधन झालं आहे. लंडनमध्ये त्यांच्या अचानक निधनाने बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे. म्हटलं जात आहे की, विजय गिलानी काही दिवसांपूर्वी कँन्सरच्या उपचारासाठी लंडनमध्ये पोहचले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्लड कॅन्सरने पीडित
एका रिपोर्टनुसार ब्लड कँन्सर पीडित विजय गिलानी तिन महिन्यांआधी आपल्या परिवारासोबत बोन मैरो ट्रांस्प्लांटसाठी लंडनला गेले होते.  त्यांना काही महिन्यांआधीच स्वत:ला कँन्सर असल्याचं समजलं होतं. मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नांना देखील यश आलं नाही. 


प्रसिद्ध फिल्म निर्मात्यांमध्ये सहभाग
विजय गिलानी बॉलिवूडचे सक्सेसफुल प्रोड्यूसरमधील एक होते. त्यांनी बरेच हिट सिनेमांची निर्मीती केली आहे. त्यांनी १९९२ साली सलमान खानचा सूर्यवंशी हा सिनेमा प्रोड्यूस केला आहे. विजय गिलानी यांनी अक्षय कुमार यांचा अजनबी आणि यानंतर सलमान खानचा वीर सिनेमा प्रोड्यूस केला होता.



या चित्रपटाची अखेरची निर्मिती
विजय गिलानी यांनी शेवटचा 'द पॉवर' (२०२१) हा चित्रपट निर्मित केला होता. ज्यात विद्युत जामवाल आणि श्रुती हसन, झाकीर हुसेन, प्रतीक बब्बर, सचिन खेडकर आणि जिशु सेनगुप्ता सारख्या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. हा चित्रपट या वर्षी जानेवारीमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. या चित्रपटाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केलं होतं.