मुंबई : देशभरात करोना माहामारीचा प्रादुर्भाव वेगाने वाढताना दिसत आहे. या आजाराने बर्‍याच लोकांचा बळी घेतला आहे . या संसर्गामुळे बरेच लोक आपल्या प्रियजनांना गमवत आहेत .छोट्या पडद्यावरची अभिनेत्री रिद्धिमा पंडित हिच्या आईचेही करोनामुळे निधन झालं आहे. यापूर्वी तिला कोरोनाची लागण झाली होती. याबद्दल रिद्धिमाने आईला गमावल्याची व्यथा सोशल मीडियावर व्यक्त केली आहे. पोस्ट शेअर करत आपल्या भावना तिने व्यक्त केल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिद्धिमा सध्या खूप कठीण परिस्थितीचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत तिने लिहीलेली पोस्ट खूपच भावूक आहे. या पोस्टमध्ये तिने लिहलं आहे की, ''मम्मा, मॉम्झी, छोटी बेबी, अशीच मी तुला हाक मारायचे. मी तुला खूप जास्त मिस करत आहे पण मला तुझ्या अस्तित्वाची जाणीव आहे.



तुझ्यासोबतच घालवलेला प्रत्येक क्षण तू आमच्यासाठी मागे सोडला आहेस. तुझं संपूर्ण आयुष्य तू आमच्यासाठी वेचलंस. त्यासाठी तुझे आभार.”रिद्धिमाच्या आई ६८ वर्षांच्या होत्या. त्या अनेक वर्षांपासून किडनीच्या समस्येने त्रस्त होत्या. आपल्या आईला गमावल्याचं दुःख तिने एका पोस्टमधून व्यक्त केलं आहे.


रिद्धिमा पुढे लिहिते, ''मी आता माझ्या मित्रमैत्रिणींना हे सांगू शकणार नाही की आईने बनवलेलं गुजराती जेवण पाठवतेय…मी कधी तुझ्याकडून स्वयंपाकही नाही शिकले. कुणास ठाऊक माझी मुलं आता काय खातील? पण मी मात्र स्वतःला अजूनही लहान मूलच समजते. हा विचारही करवत नाही की आता मी तुझ्या हातची चव चाखू शकणार नाही.''रिद्धिमाच्या भावूक करणाऱ्या या पोस्टवर तिच्या अनेक मित्रांनी आणि सहकलाकारांनी सांत्वनपर कमेंट्स केल्या आहेत. तिच्या चाहत्यांनीही तिचं सांत्वन केलं आहे.


रिद्धीमा येथेच थांबली नाही, तिने पुढे लिहिले की, 'तुझे नाव माझ्या फोनवर कधी फ्लॅश होणार नाही. मी औषधोपचार न घेतल्यावर  किंवा योग्यवेळी  खाण्याबद्दल कधीही तू ओरडणार नाहीस या गोष्टीचा मला खूप त्रास होत आहे. तु आयुष्यातील शेवटची पाच वर्षे माझ्यासाठी जगलीस. स्वतःला त्रास होत असतानाही आयुष्यातली शेवटची पाच वर्षे तू फक्त माझ्यासाठी जगलीस.


मला माहित आहे आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की तुझं सगळं दुःख, सगळा त्रास आता संपला. मी तुला तिथे वर चमकताना पाहू शकत आहे. आम्हा सर्वांना तुझा आशिर्वाद सदैव लाभो. आता काहीच त्रास नाही. फक्त आराम. मला माहित आहे तू सदैव माझ्या सोबत असशील.'' रिद्धिमा पंडित 'बहू हमारी रजनीकांत' मध्ये दिसली होती. याशिवाय ती 'खतरों के खिलाड़ी 9' ची द्वितीय रनअप ठरली आहे.