नवी दिल्ली : भारताचा सिनेमा आता हॉलीवूडप्रमाणे २००० कोटी क्लबमध्ये जाण्यास पूर्णपणे तयार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रभासचा बाहुबली २ सिनेमा चीनमध्ये प्रदर्शित होण्यास हिरवा कंदिल मिळालाय. यानंतर २००० कोटी पर्यंत कमाई करणारा हा पहिला सिनेमा होणार आहे. 


चीन मध्ये होणार रिलीज 


बाहुबली २ चीनमध्ये रिलीज होतोय. खूप मोठ्या अवधीनंतर चीनमधून प्रमाणपत्रावर सही मिळाली आहे.


चीनच्या सेंसर बोर्डने याला हिरवा कंदील दिलाय. निर्मात्यांनी अधिक मोठ्या स्तरावर पोहोचविण्याची तयारी सुरू केली आहे. सिनेमाने आतापर्यंत १७१५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. 


६००० स्क्रिन्सवर रिलीज 


बाहुबली जगभरात ६००० स्क्रीन्सवर रिलीज करण्यात आली होती. पहिल्या भागाच चीनमध्ये डोक्यावर घेण्यात आले होते. जर चीनमध्ये ३०० कोटी रुपये या सिनेमाने कमावले तर बाहुबली 'दंगल'ला मागे टाकेल.