बाहुबलीने दुसऱ्यांदा केली केरळला 1 करोडची मदत
मदतीसाठी केला हात पुढे
मुंबई : केरळमध्ये आलेल्या महाप्रलयानंतर येथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. तेथील नागरिकांना खूप कठीण प्रसंगांना तोंड द्याव लागत आहे. पूर्ण देशातून लोकं केरळच्या मदतीसाठी उभी राहिली आहे. तसेच फिल्म इंडस्ट्रीतील अनेक कलाकार सतत केरळला मदत करताना दिसत आहे. बाहुबली म्हणजे प्रभासने पुन्हा एकदा केरळला मदतीसाठी हात पुढे केला आहे. या आधी प्रभासने केरळला काही गरजेचं सामान आणि 25 लाखाची मदत केली होती. आता पुन्हा एकदा प्रभासने 1 करोड रुपये दिले आहेत.
केरळचे मंत्री कदकंपल्ली सुरेंद्रन यांनी दिलेल्या माहितीनुसार तेलुगू अभिनेता प्रभासने दुसऱ्यांदा केरळ मुख्यमंत्री मदत कोटात एक करोड रुपये दान करून मदत केली आहे. प्रत्येकाने प्रभासचा आदर्श ठेवायला हवा.
बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी केरळला मदत केली आहे. यामध्ये शाहरूख खान, ऋतिक रोशन, सुशांत सिंह राजपूत आणि अक्षय कुमार सारख्या मोठ्या कलाकारांनी मदत केली आहे. फिल्म निर्माता प्रियदर्शनने आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे.