मुंबई : सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक मुलगा आणि मुलगी ऐश्वर्या रायच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे दोघंही मुंबईच्या ट्रेनमध्ये डान्स करताना दिसत आहेत. त्यांच्या डान्स मूव्ह्स चाहत्यांना खूप आवडतायेत. लोकलमध्ये एक मुलगा आणि एक ट्रान्सजेंडर दोघंही क्लासिकल स्टाईलमध्ये डान्स करताना दिसत आहेत.   त्यांच्या स्टेप्स आणि एक्सप्रेशन अप्रतिम आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. हा मुलगा बाहुबली चित्रपट अभिनेता प्रभाससारखा दिसतो. यामुळे हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून युजर्स कमेंट करुन त्याला प्रभासची कार्बन कॉपीही म्हणत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावर सोशल मीडिया यूजर्स भरपूर कमेंट करत आहेत, एका यूजरने लिहिलं आहे की,  Amazing performance. त्याचबरोबर, दुसर्‍या यूजरने लिहिलं की,  दोघांची लय जुळत आहे. सर्वोत्तम नृत्य. त्याचबरोबर दुसऱ्या यूजरने लिहिलं की, ऐश्वर्याच्या गाण्यावर इतका अप्रतिम डान्स पाहून मजा आली.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हे गाणं ऐश्वर्या रायवर चित्रित करण्यात आलं आहे. हे गाणं ताल चित्रपटातील आहे. ज्यामध्ये अनिल कपूर ऐश्वर्या रायसोबत दिसला होता. हे गाणं उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी गायलं होतं. या गाण्यात ऐश्वर्या खूप सुंदर दिसत होती आणि हे तिच्या सर्वोत्तम नृत्य परफॉर्मन्सपैकी एक आहे.