Bail or Jail : आर्यन खान आईच्या वाढदिवसाला घरी असणार का?
आर्यन खानच्या आईचा गौरी खानचा आज 8 ऑक्टोबरला वाढदिवस
मुंबई : शाहरूख खान आणि गौरी खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. NCB ने ड्रग्स प्रकरणात ही कारवाई केली आहे. क्रझवरील धाड टाकून NCB ने आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमुन धमेता यांच्यासह इतरांना अटक केली आहे. 7 ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली होती. आर्यन खानच्या वकिलांनी सतीश मानेशिंदे यांनी जामीनाची मागणी केली आहे. याबाबतची सुनावणी आज 12 वाजता होणार आहे.
ANI ने दिलेल्या माहितीनुसार, एस्प्लेनेड मॅजिस्ट्रेट कोर्ट आर्यन खानच्या जामीन अर्जावर 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता सुनावणी करणार आहे. एनसीबीला देखील उत्तर देण्यास सांगितले आहे. या गोष्टी न्यायालयातील युक्तिवादांवर अवलंबून असताना. जर आर्यन खान जामीन मिळवण्यात यशस्वी झाला, तर तो आई गौरी खानच्या वाढदिवसाला घरी येणार आहे. 8 ऑक्टोबरला शाहरुख खानची पत्नी गौरी खानचा वाढदिवस आहे. आर्यनला जामीन मिळाल्यास शाहरुख खान आणि गौरी खानला दिलासा मिळेल.
न्यायालयीन कोठडीच्या निकालानंतर आर्यन खानला उशीर झाल्याने एनसीबी कार्यालयात नेण्यात आले. कोविड -19 अहवालाशिवाय तुरुंग नवीन कैद्यांना स्वीकारणार नाही. 3 ऑक्टोबरपासून आर्यन खान एनसीबी कार्यालयात आहे. जिथे त्याची चौकशी करण्यात आली. सोशल मीडियावर, चाहते शाहरुख खान, तसेच आर्यन खानच्या बाजूने उभे आहेत.