`बाईपण भारी देवा`मधील अभिनेत्रीने बनवल्या लुसलुशीत पुरणपोळ्या, व्हिडीओ पाहून तुम्हीही कराल कौतुक
आता `नाच गं घुमा` या चित्रपटात झळकणार आहेत. प्रत्येक स्त्री आणि तिचं विश्व काही औरचं असतं आणि अशाच बाईपणाची गोष्ट या चित्रपटाच्या निमित्ताने सादर केली जाणार आहे.
Sukanya Mone Make Puran Poli : होळी म्हटलं की पहिल्यांदा आठवण येते ती म्हणजे पुरणपोळीची. 'होळी रे होळी, पुरणाची पोळी…' असे म्हणत घरोघरी पुरणपोळीवर ताव मारला जातो. त्यामुळे खवय्यांसाठी होळीचा दिवस हा फारच खास असतो. खमंग, लुसलुशीत पुरणपोळ्या खायला अनेकांना आवडतात. आता एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने व्यस्त कामकाजातून वेळ काढून पुरणपोळ्या बनवल्या आहेत. याचा एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे.
अभिनेत्री सुकन्या मोने या सतत काही ना काही कारणांनी चर्चेत असतात. बाईपण भारी देवा या चित्रपटामुळे त्या प्रसिद्धीझोतात आल्या. आता लवकरच त्या 'नाच गं घुमा' या चित्रपटात झळकणार आहेत. आता नुकतंच भाग्यश्री करंदीकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरुन सुकन्या मोनेंचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्या अॅप्रन घालून पुरणपोळ्या करताना दिसत आहेत. यात त्या पुरण वाटून गोळे तयार करताना दिसत आहेत. यावर स्वयंपाकाची खरी आवड, खूप जास्त व्यस्त असूनही होळीच्या आधीच्या रात्री पूरणपोळ्या तयार केल्या, असे या व्हिडीओत म्हटले आहे.
सुकन्या मोनेंचा पुरणपोळ्या बनवतानाचा व्हिडीओ
या व्हिडीओला कॅप्शन देताना "खूप जास्त व्यस्त असणाऱ्या सुकन्याताई, होळीच्या एक रात्र आधी पूरण पोळ्या करतायत… ही आवड पण आणि एक तळमळ पण, आपल्या घरच्या मंडळींना त्या सणाला तो सूटेबल पदार्थ मिळण्याची ! Truely Inspiring ! हे तुमचे efforts शेयर केल्याबद्दल खूप धन्यवाद ! होळीच्या लाख लाख शुभेच्या….", असे त्यांनी म्हटले आहे. यावर सुकन्या मोने यांनी होळीच्या खूप खूप शुभेच्छा अशी कमेंट केली आहे.
सुकन्या मोनेंचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर मेघना एरंडने हार्ट इमोजी शेअर करत कमेंट केली आहे. तर अनेक चाहत्यांनी यावर 'खूपच मस्त' असे म्हटले आहे. तर काहींनी सुकन्या मोने यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान गेल्या कित्येक वर्षांपासून अभिनेत्री सुकन्या मोने या विविध भूमिका साकारुन प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतात. सुकन्या मोने यांनी नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात काम करुन प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. सुकन्या यांनी मराठीसह हिंदी मनोरंजन सृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या 'बाईपण भारी देवा' या चित्रपटात त्या झळकल्या होत्या. त्यानंतर आता 'नाच गं घुमा' या चित्रपटात झळकणार आहेत. प्रत्येक स्त्री आणि तिचं विश्व काही औरचं असतं आणि अशाच बाईपणाची गोष्ट या चित्रपटाच्या निमित्ताने सादर केली जाणार आहे.