Suchitra Bandekar on Aadesh Bandekar : सध्या चर्चा आहे ती म्हणजे 'बाईपण भारी देवा' या चित्रपटाची. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर पुरता धुमाकूळ घातला आहे. गेल्या वर्षीपासून या चित्रपटाची प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता लागून राहिली होती. आता हा चित्रपट यावर्षी 30 जूनला प्रदर्शित झाला आहे त्यामुळे समस्त मराठी प्रेक्षकांनी या चित्रपटाला अक्षरक्ष: उचलून धरला आहे. 26 कोटीहून अधिक बॉक्स ऑफिस कलेक्शन या चित्रपटानं केलं आहे. त्यामुळे हा चित्रपट 'वेड' आणि 'सैराट'नंतर सर्वाधिक सुपरहीट सिनेमा ठरला आहे.  कलाकारांचा आणि दिग्दर्शकांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. यावेळी पहिल्या विकेंडला चांगली कमाई करत दुसऱ्या आठवड्यातही हा चित्रपट प्रेक्षकांनी उचलून धरला आहे. अनेकांनी तर हा चित्रपट दोनदा पाहण्याचीही तंबी लावली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या या चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिसादाकडे पाहता या चित्रपटानं अक्षरक्ष: बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असून परदेशातही हा चित्रपट भाव खावून गेला आहे. सुचित्रा बांदेकर, वंदना गुप्ते, रोहिणी हट्टंगडी, दिपा चौधरी, शिल्पा नवलकर, सुकन्या मोने यांच्या अफलातून अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. प्रत्येकीचे एकमेकांशी असणारे नाते या चित्रपटातून पाहायला मिळते आहे. त्यामुळे हा चित्रपट बहीणींच्या नात्यावर भाष्य केले आहे. त्यातून हास्य, विनोदी, मैत्री, नातं आणि इमोशन्स सोबतच ड्रामा यानं हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. या चित्रपटाच्या यशाचे सेलिब्रेशन सर्वत्र सुरू आहे. 


हेही वाचा - काजोल तेव्हा आणि आता! Nysa Devgan च्या आईनं खरंच केलीये स्कीन लाईटनिंग सर्जरी?


परंतु सध्या सुचित्रा बांदेकर यांच्या एका वक्तव्याची चर्चा रंगली आहे. 'बाईपण भारी देवा' या चित्रपटात त्यांच्या पतीचे विवाहबाह्य संबंध असतात. त्यामुळे त्या पुर्णपणे दुखावलेल्या असतात. त्यांच्या पतीनं (तुषार दळवी) त्यांना घटस्फोटाची नोटीसही देतात. अशावेळी त्या काहीकरून आपल्या नवऱ्याला सोडायला तयार नसतात. आपल्या भुमिकेबद्दल त्या बोलल्या आहेत आणि ही भुमिका त्या प्रत्यक्षात रिलेट करतात का वरही त्यांनी सांगितले आहे. 'बीबीसी मराठी'ला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी याचा खुलासा केला आहे की जर का आदेश बांदेकर यांनी विवाहबाह्य संबंध ठेवले तर...? यावर स्पष्टपणे त्या म्हणाल्या की, ''तिची भूमिका बघून मी रिलेट करू शकले पण तिची गोष्ट मी माझ्या आयुष्याशी रिलेट करू शकत नाही. कारण आदेश खूप चांगला आहे. तो लफडी वगैरे करत नाही किंवा त्या वाट्याला कधी जातही नाही. नाहीतर चित्रपटातील पल्लवी जशी रिॲक्ट झाली आहे त्यापेक्षा चौपट मी रिॲक्ट होईन हे आदेशला माहीत आहे.''



सध्या 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट हिंदी चित्रपटांच्याही वरचढ ठरला आहे. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर एक वेगळाच इतिहास निर्माण करतो आहे.