मुंबई : बॉक्स ऑफिसवर सध्या आयुष्मान खुरानाचा (Ayushmann Khurrana)'बाला' (Bala) सिनेमा धुमाकूळ घालत आहे. 'बाला' हा सिनेमा अगदी पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर चर्चेत आहे. सिनेमा समीक्षक तरण आदर्श यांच्यानुसार, 'बालाने फक्त 4 दिवसांत 50 करोडहून अधिक कमाई केली आहे.' 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'बाला' सिनेमातून पुन्हा एकदा आपल्या अभिनयावर यशाची मोहर उमटवणारा अभिनेता आयुष्मान खुराना सगळ्यांच्याच मनातील ताईत बनला आहे. आयुष्मानच्या अभिनयाला प्रेक्षकांनी भरपूर पसंत केलं आहे. अमर कौशिक यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात आयुष्मान खुरानासोबत यामी गौतम, भूमी पेडणेकर, जावेद जाफरी आणि सौरभ शुक्ला यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. (हे पण वाचाकलाविश्वात यश मिळूनही आयुष्मान कोणत्या प्रयत्नांत?)


सिनेमाच्या यशाबद्दल बोलताना आयुष्मान खुराना म्हणाला की,'मी आशा करतो की, हा सिनेमा संपूर्ण भारतभर मनोरंजन करेल. बाला सिनेमातून मनोरंजनातून सामाजिक संदेश देण्यात आला आहे.' सिनेमाच्या संपूर्ण यशाचं श्रेय आयुष्मानने संपूर्ण टीमला दिलं आहे. 



राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता आयुष्मान खुराना गेल्या वर्षभरापासून चांगलाच चर्चेत आहे. मुळात तो चर्चेत असण्यापेक्षा अभिनय कारकिर्दीमध्ये तो अशा एका टप्प्यावर आहे, जेथे एक अभिनेता म्हणून आयुष्मान खऱ्या अर्थाने एक नवा पायंडा पाडत आहे. बहुविध भूमिकांना न्याय देणाऱ्या आयुष्मानचा बाला हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. कलाविश्वात हा चित्रपट चांगलाच यश मिळवत आहे. 


कमाईचे आकडे म्हणू नका किंवा मग प्रेक्षक आणि समीक्षकांची दिलखुलास दाद म्हणू नका, प्रत्येक बाबतीत आयुष्यमानचीच सरशी पाहायला मिळत आहे. पण, आपल्या वाट्याला येणाऱ्या या यशानंतरही आयुष्मान मात्र संतुष्ट नसल्याचं कळत आहे. त्याची एकंदर वक्तव्य पाहता तो इतक्यावरच शांत बसणाऱ्यांपैकी नाही हेच स्पष्ट होत आहे.