मुंबई : राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता आयुष्मान खुराना गेल्या वर्षभरापासून चांगलाच चर्चेत आहे. मुळात तो चर्चेत असण्यापेक्षा अभिनय कारकिर्दीमध्ये तो अशा एका टप्प्यावर आहे, जेथे एक अभिनेता म्हणून आयुष्मान खऱ्या अर्थाने एक नवा पायंडा पाडत आहे. बहुविध भूमिकांना न्याय देणाऱ्या आयुष्मानचा बाला हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. कलाविश्वात हा चित्रपट चांगलाच यश मिळवत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कमाईचे आकडे म्हणू नका किंवा मग प्रेक्षक आणि समीक्षकांची दिलखुलास दाद म्हणू नका, प्रत्येक बाबतीत आयुष्यमानचीच सरशी पाहायला मिळत आहे. पण, आपल्या वाट्याला येणाऱ्या या यशानंतरही आयुष्मान मात्र संतुष्ट नसल्याचं कळत आहे. त्याची एकंदर वक्तव्य पाहता तो इतक्यावरच शांत बसणाऱ्यांपैकी नाही हेच स्पष्ट होत आहे. 


येत्या काळात आपण अधिक चांगल्या कथानकांच्या चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा आणि त्याच दृष्टीने आपले प्रयत्न असण्याचं म्हणत पुढे अधिक चांगले चित्रपट करण्याकडेच आपला कल असल्याचा त्याचा मानस आहे. 'अधिक चांगले चित्रपट करण्याचीच मला भूक आहे. ही एक अशी गोष्ट आहे, जी मला एक अभिनेता म्हणून अधिक समृद्ध  करत असते. नव्या कामाच्या शोधासाठी अधिक प्रेरणा देत', असं तो म्हणाला. चित्रपटांचं माध्यम हे आता सामाजिक बदलांनाही वाव देणारं ठरत असल्याच्या मुद्द्यावर त्याने जोर दिला. 



येत्या काळाता आयुष्मान अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'गुलाबो- सिताबो' या चित्रपटात झळकणार आहे. तर, 'शुभ मंगल ज्यादा सावधान' या आणखी एका नव्या धाटणीच्या चित्रपटातूनही तो नव्या रुपात दिसणार आहे.