मुंबई : बॉलिवूड आणि टीव्ही विश्वात सध्या विवाहाचे वारे वाहत आहेत. अशात 'बालिका वधू'मालिकेची छोटी सून म्हणून लोकप्रियता मिळवलेली आनंदी अर्थात अविका गोर (Avika Gor)च्या चाहत्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. अविका गोरने लग्न केल्याच्या चर्चांना सध्या  उधान  आलं आहे. सोशल मीडियावर तिच्या लग्नाचे फोटो देखील तुफान व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये अविका नवरीच्या रूपात अत्यंत सुंदर दिसत आहे. तिच्या लग्नानंतर आता तिने लपून लग्न का केलं ? असा प्रश्न  तिचे चाहते विचारत आहेत. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अविकाने  शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती  ख्रिश्चन वधूच्या रूपात दिसत आहे. ती पारंपरिक पांढऱ्या रंगाच्या गाउनमध्ये दिसत आहे. अविकाचे लग्नाचे फोटो पाहून तिला सोशल मीडियाला अनेक प्रश्न विचारले जात आहेत. अविकाच्या समोर उभ्या असलेल्या नवरा मुलगा आदिलचा लूक देखील फार उठावदार दिसत आहे. 


सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये, 'फायनली' तो काळ्या रंगाच्या टक्सीडोमध्ये फार हँडसम दिसत आहे. 'कादली- स्टे ट्यून' असं लिहिलं आहे. हे कॅप्शन वाचून तिच्या आगामी गाण्याचं चित्रीकरण असल्याचं वाटत आहे. अविकाचे हे फोटो सोशल मीडिया तुफान व्हायरल होत आहेत. तर चाहते तिला शुभेच्छा देखील देत आहेत.