तुरूंगातून बाहेर येताचं अभिनेत्रीचा हटके अंदाज सर्वत्र चर्चेत
42 हजार 700 रूपये जातमुचलक्यावर अभिनेत्रीला जामीन मंजूर
ढाका : बांग्लादेशची प्रसिद्ध अभिनेत्री पोरी मोनी 26 दिवसांच्या तुरुंगवासानंतर बाहेर आली आहे. पोरी मोनीला ढाका महानगर सत्र न्यायालयाने 42 हजार 700 रूपये जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे. तुरूंगातून बाहेर येताच तिचा हटके अंदाज सर्वांना पाहायला मिळाला. पोरी मोनी तिच्या खास आणि हटके अंदाजामुळे चर्चेत आली आहे. पोरी मोनी या नावाने ओळखली जाणारी प्रसिद्ध अभिनेत्री शमसुन्नहर स्मृती आता तुरूंगातून बाहेर आली आहे. बाहेर येताचं तिने चाहत्यांना भेट दिली.
दरम्यान, तुरूंगातून बाहेर आल्यानंतर अभिनेत्रीच्या गाडीच्या भोवती चाहत्यांनी एकचं गर्दी केली. यावेळी चाहत्यांनी तिच्यासोबत फोटो देखील काढले. ढाकामधील बनानी येथील बांगलादेशी अभिनेत्री पोरी मोनीच्या घरावर रॅपिड ऍक्शन बटालियनने (आरएबी) 4 ऑगस्ट रोजी छापा टाकला.
या छापेमारीत पोरी मोनीच्या घारातून आरएबीच्या टीमने 30 परदेशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. त्यानंतर अभिनेत्रीलाही ताब्यात घेतले. यावेळी अभिनेत्री अधिकारी बळजबरी घरात घूसले असल्याचा आरोप केला. पोरी मोरी म्हणाली, 'साध्या वेशातील काही लोक माझ्या घरात येण्याचा प्रयत्न करत होते. मी त्यांनी विचारलं की तुम्ही कोण आहात, तेव्हा त्यांनी पोलीस असल्याचं सांगितलं. '
'नंतर त्यांनी गेट तोडून माझ्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. मी पोलीस स्टेशनला फोन केला, पण माझ्या घरी कोणी आले नाही. मला माझ्या जीवाची भीती वाटत आहे. असं देखील अभिनेत्री म्हणाली. यापूर्वी पोरी मोरी चर्चेत आली, जेव्हा तिने ढाक्याच्या एका व्यवसायिकावर बलात्कार आणि मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.