मुंबई : 'याद आ रहा हैं...'  या गाण्यामुळे प्रत्येक जण आपल्या खास व्यक्तीच्या प्रेमात बुडाला.. पण आता आपल्याला आपल्या खऱ्या प्रेमाची जाणीव करून देणारे ज्येष्ठ गायक आणि संगीतकार बप्पी लहरी काळाच्या पडद्याआड गेले आहेत. बप्पी दा यांनी अनेक गाणी गायली आणि त्यांच्या गाण्यामुळे अनेकांना जगण्याची नवी उमेद मिळाली, तर अनेक गायकांच्या प्रेरणास्थानी बप्पी दा होते... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्यांना आपण बप्पी दा म्हणून ओळाखयचो त्याचं खरं नाव बप्पी लहरीनसून अलोकेश लहरी होतं. त्यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1952 रोजी पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी याठिकाणी झाला. 



बप्पी दा यांच्या आईचं नाव बन्‍सारी लहरी आणि वडिलांचं नाव अपरेश लहरी होतं.  बप्पी लहरी यांनी वयाच्या 69 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील क्रिटी केअर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच त्यांनी कलाकारा जगाचा निरोप घेतला.


बप्पी लहरी हे त्यांच्या मनमिळाऊ आणि तितक्याच प्रेमळ स्वभावासाठी ओळखले जात होते. संगीतदिग्दर्शन, गायन यासोबतच त्यांनी रिऍलिटी शोसाठी परीक्षकाचीही भूमिका बजावली होती.