Priyanka Chopra मुळे शाहरूख खान आणि गौरी खानचा संसार संकटात?
एक वेळ अशी होती जेव्हा त्यांच्या लग्नात मतभेद निर्माण झाले होते आणि त्याचे कारण होतं
Sharukh Khan : शाहरुख खानला इंडस्ट्रीत रोमान्सचा बादशाह म्हटले जाते. त्याच्या चित्रपटांमुळे तो जगभर ओळखला जातो. शाहरुखचे करोडो फॅन फॉलोवर्स आहेत. प्रत्येक अभिनेत्याचे स्वप्न असते की तो शाहरुख खानसोबत एकदा काम करेल. चित्रपटांव्यतिरिक्त शाहरुख त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही जनमानसात लोकप्रिय आहे.
सगळ्यांनाच माहित आहे की तो त्याच्या कुटुंबावर खूप प्रेम करतो त्यातून त्याला आणि गौरीला आयडॉल कपल म्हणतात. पण तुम्हाला माहीत आहे का की एक वेळ अशी होती जेव्हा त्यांच्या लग्नात मतभेद निर्माण झाले होते आणि त्याचे कारण होतं प्रियांका चोप्रा.
शाहरुख खान आणि प्रियांका चोप्रा यांनी 2006 साली रिलीज झालेल्या 'डॉन' चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटामुळे दोघांनाही खूप पसंती मिळाली होती. ह चित्रपट 1977 साली प्रदर्शित झालेल्या बीग बी अमिताभ बच्चन यांच्या डॉन या अजरामर चित्रपटाचा रिमेक होता.
यानंतर दोघेही पुन्हा एकदा 'डॉन 2'मध्ये एकत्र दिसले होते. तेव्हा मीडियात शाहरुख आणि प्रियांकाच्या मैत्रीची चर्चा सुरू झाली होती. 2011 मध्ये डॉन 2 मध्ये एकत्र काम केल्यानंतर दोघांनी डेट करायला सुरुवात केली होती असंही तेव्हा बोललं गेलं होतं. दोघांनाही एका रेस्टॉरंटच्या बाहेर पापाराझींनी पाहिले होते. शाहरूख खान मात्र या बातम्या अफवा होत्या म्हणून नेहमीच घेत आला आहे.
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि प्रियांका चोप्रा यांनी 'डॉन' चित्रपटादरम्यान डेट करायला सुरुवात केली होती. प्रियांका आणि शाहरुख खान अनेकदा रात्री उशिरा एकत्र दिसले होते. पण शाहरुख खानने प्रियांका चोप्रासोबतच्या आपल्या अफेअरवरील चर्चांबद्दल सांगितले की, आम्ही चांगले मित्र आहोत.
शाहरुख आणि प्रियांकाच्या अफेअरचे किस्से गौरी खानच्या कानावरही पोहोचले होते अशीही माहिती समोर आली होती. अशा वेळी ती खूप चिडली आणि तिने शाहरुखशी खूप भांडणही केले होते.
प्रियांका चोप्रा तिच्या आणि शाहरुख खानच्या अफेअरबद्दल कधीच उघडपणे बोलली नाही.