आर्यन खान केसनंतर `या` बॉलिवूड स्टारकिड्सचा भारत देश सोडण्याचा निर्णय?
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या ड्रग्ज प्रकरणात तुरुंगात आहे.
मुंबई : शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या ड्रग्ज प्रकरणात तुरुंगात आहे. त्यांच्यावर अमली पदार्थांचे व्यवहार केल्याचा आरोप आहे. ड्रग्स प्रकरणात आर्यन खानला अटक झाल्यानंतर जवळजवळ संपूर्ण बॉलीवूड शाहरुख खान आणि त्याच्या कुटुंबासोबत उभे असल्याचे दिसत आहे. अनेक बॉलिवूड स्टार्स सोशल मीडिया आणि मुलाखतींद्वारे त्याच्या कुटुंबाला पाठिंबा देत आहेत.
या सगळ्या दरम्यान, बॉलिवूड अभिनेता KRK (कमल आर खान), जो स्वत: चं चित्रपट समीक्षक म्हणून वर्णन करतो, त्याने फिल्म इंडस्ट्रीच्या स्टार किड्सबद्दल मोठा खुलासा केला आहे. KRK बऱ्याचदा चित्रपट उद्योगाबद्दल आणि त्याच्याशी निगडीत स्टार्सबद्दल आपली प्रतिक्रिया देतो. तो स्टार्सवर खुलेपणाने टीका करण्यासाठी ओळखला जातो. मात्र, बऱ्याच वेळा केआरकेला ट्रोलर्सचाही सामना करावा लागतो.
आता त्याने दावा केला आहे की ड्रग्स प्रकरणात आर्यन खानला अटक केल्यानंतर अनेक बॉलिवूड स्टार किड्स भारत सोडण्याचा विचार करत आहेत. केआरकेने सोशल मीडियाद्वारे हे सांगितले आहे.
केआरके सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तो प्रत्येक मुद्द्यावर मुक्तपणे आपले मत देत राहतो. केआरकेने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर बॉलिवूडच्या स्टार किड्सबद्दल हा खुलासा केला आहे.
त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले, 'माझ्या सूत्रांनुसार अनेक सेलिब्रिटी किड्स आर्यन खानच्या घटनेनंतर भारत सोडण्याचा विचार करत आहेत! त्यांना असे वाटते की जर हे आर्यन खानच्या बाबतीत घडू शकते, तर ते कोणासोबतही होऊ शकते! ' केआरकेचे हे ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याच्या या ट्विटवर अभिनेत्याचे चाहते आपली प्रतिक्रिया देत आहेत.