Amrita Singh Birthday Special : बॉलिवूड अभिनेत्री अमृता सिंग ही 80 च्या आणि 90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.  आज 9 फेब्रुवारी रोजी अमृताचा 66 वा वाढदिवस आहे. अमृताचा बिनधास्त स्वभाव आपल्या सगळ्यांना माहित आहे. अमृता कधीच कोणत्या गोष्टीचा विचार करत नाही तिला जे वाटतं ते ती सरळ स्पष्ट सांगते. मात्र, तुम्हाला तिच्याविषयी असलेली एक गोष्ट माहितीये का? ती म्हणजे फक्त एका गोष्टीमुळे अमृता सिंग ही रवी शास्त्री यांची पत्नी होतात होता राहिली. मग त्यांचं लग्न का नाही झालं असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर चला जाणून घेऊया काय आहे त्या मागचं कारण...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

80 च्या दशकात अमृता ही माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा रंगली होती. त्या दोघांची पहिली भेट ही एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. हळूहळी मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. इतकंच नाही तर ते दोघं एका मॅगझिनच्या कव्हर पेजवर देखील एकत्र झळकले होते. त्यानंतर काय तर त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. रिपोर्ट्सनुसार, अमृता आणि रवी शास्त्री यांचा साखरपुडा देखील झाला होता. दोघे लग्न देखील करणार होते. पण या सगळ्यात त्यांचं नातं पुढे जाऊ शकलं नाही आणि त्यांनी त्याला पूर्णविराम देण्याचं ठरवलं. 


लग्नासाठी अमृतासमोर ठेवली होती अट?


असं म्हटलं जातं की रवी शास्त्री यांनी अमृता सिंहसमोर लग्नाआधी एक अट ठेवली होती. तर अमृताला ती अट मान्य नव्हती. ती अट म्हणजे अमृताला लग्नानंतर अभिनय क्षेत्राला राम राम करावा लागेल. त्यामुळे त्यांचा ब्रेकअप झाला. तर 1990 मध्ये रवी शास्त्री आणि रितूचं लग्न झालं. 


अमृताच्या आयुष्याविषयी बोलायचं झालं तर त्यानंतर तिच्या आयुष्यात सैफ अली खान आला. अमृता आणि सैफ अली खानची भेट देखील एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. त्या दोघांच्या वयात फरक होता, तर अमृता ही सैफ अली खानपेक्षा वयानं मोठी होती. त्यामुळे त्यांच्या लग्नाच्या विरोधात अनेक लोक असल्याचे म्हटले जाते. मात्र, तरी देखील त्या दोघांनी 1991 मध्ये लग्न केलं. लग्नाच्या 13 वर्षांनंतर त्याचा घटस्फोट झाला. त्यानंतर सैफ अली खाननं करीना कपूरशी दुसरं लग्न केलं.