या कारणामुळे ही मुलगी आज अंबानी कुटुंबाची सून
लग्न हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील महत्त्वाचा सोहळा असतो.
मुंबई : लग्न हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील महत्त्वाचा सोहळा असतो. सासरी जाताना मुलींची एकच इच्छा असते, की तिथेही तिला माहेर प्रमाणे प्रेम आणि आदर मिळावा. सगळ्यांसोबत तिचं बॉण्डिग अधिक चांगलं व्हावं. होणारा नवरा आणि त्याचं कुटुंब याबाबत मुलगी सर्वात जास्त विचार करते.
प्रत्येक मुलीची इच्छा असते की चांगल्या घरात तिला संसार करता यावा. असंच काहीसं स्वप्न श्लोका मेहता हिने देखील पाहिलं असेल. आणि आज ती एका मोठ्या प्रसिद्ध कुटुंबाची सून बनली आहे. श्लोका मेहता ही प्रसिद्ध हिरे व्यापारी Russell Mehta आणि Mona Mehta यांची लेक आहे.
आता ती अंबानी कुटुंबाची मोठी सून आहे. आकाश अंबानी याच्यासोबत लग्नगाठ बंधत तिने अंबानींच्या घरात पाऊल ठेवलं आणि आज ती सुखी संसार करताना दिसत आहे. केला. अंबानी कुटुंबाकडे आज जे काही आहे, ते त्यांनी आपल्या मेहनतीने कमावले आहे यात शंका नाही. मुकेश अंबानी जन्माने श्रीमंत झाले असे नाही.
प्रत्येक सामान्य माणसाप्रमाणे त्यांनीही बालपणात अनेक चढउतार पाहिले आहेत. पैशाचे महत्त्व त्यांना नीट कळते इतकेच नाही तर त्यांनी आपल्या तीन मुलांनाही हाच गुण शिकवला आहे.
देशातील सर्वात श्रीमंत कुटुंब असूनही अंबानी कुटुंब आपल्या सभ्यतेसाठी ओळखले जाते. मुकेश अंबानी असो किंवा त्यांची पत्नी नीता अंबानी, दोघांनाही चांगले माहित आहे की कुटुंबासाठी एकत्र राहणे किती महत्त्वाचे आहे.
हे देखील एक कारण आहे की जेव्हा त्यांचा मुलगा आकाश अंबानीच्या लग्नाचा प्रश्न आला तेव्हा त्यांनी एक अशी मुलगी निवडली होती, जिला फक्त त्यांच्या कौटुंबिक मूल्यांचीच चांगली जाण नसेल, तर कुटुंबातील सर्व पद्धती ही ती नीट पार पाडेल.
श्लोका मेहता आणि आकाश अंबानी हे शालेय जीवनापासून एकमेकांचे चांगले मित्र आहेत. पण तिचं मेहुणी ईशा अंबानी हिच्यासोबत घट्ट नाते होते. अशा परिस्थितीत जेव्हा आकाश अंबानीच्या लग्नाची वेळ आली तेव्हा श्लोकाचे नाव ऐकून संपूर्ण कुटुंब सहमत झाले. कारण आकाश अंबानीशी लग्न करण्यापूर्वीच श्लोका मेहता अंबानी कुटुंबातील सर्व सदस्यांना ओळखत होती.