Gadar 2 Casting : बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा 2001 साली 'गदर' प्रदर्शित झाला होता. तब्बल 22 वर्षांनंतर आता त्याच्या दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटात अभिनेता सनी देओल आणि अमीशा पटेल यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. आता तब्बल 22 वर्षानंतर हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आता आणखी एका गोष्टीची सगळीकडे चर्चा सुरु आहे. ती म्हणजे सनी देओल आणि अमीषा पटेल या दोघांच्या आयकॉनिक भूमिकेसाठी सगळ्यात आधी दुसऱ्या कलाकारांना विचारण्यात आले होते. आता ते कोणते कलाकार होते हे जाणून घेऊया...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सनी देओल आणि अमीषा पटेल यांच्या या भूमिका प्रेक्षकांच्या मनात छाप सोडून गेल्या आहेत. अशात तारा सिंगही भूमिका साकारण्यासाठी अनिल शर्मा यांच्या नजरेत सुरुवातीपासून सनी देओल होते, असे त्यांनी सांगितले, मात्र, या भूमिकेसाठी सगळ्यात आधी गोविंदाला विचारण्यात आले होते. पण स्क्रिप्ट ऐकल्यानंतर गोविंदा घाबरला आणि त्यानं भूमिकेसाठी नकार दिल्याचे म्हटले जाते. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


बॉलिवूड हंगामाला दिलेल्या एका मुलाखतीत अनिल शर्मा यांनी सांगितले होते की 'गोविंदा या भूमिकेसाठी फायनलाइझ झाला नव्हता. पण त्यांनी हा खुलासा केला होता की त्यांनी चित्रपटाची स्क्रिप्ट ही गोविंदाला ऐकवली होती. गोविंदाला गदर एक प्रेम कहाणी या चित्रपटासाठी फायनलाइज केलं नव्हतं. 1998 मध्ये प्रदर्शित झालेल्या महाराजा चित्रपटाचं दिग्दर्शन मी केलं होतं. तेव्हा मी त्याला गदर एक प्रेम कहाणी या चित्रपटाची स्क्रिप्ट ऐकवली होती. तर असं नव्हतं की मी त्याला कास्ट केलं होतं. पण तो तर गरद एक प्रेम कथाची स्क्रिप्ट ऐकूण घाबरला होता.' 


अनिल शर्मा पुढे चित्रपटाविषयी म्हणाले की 'त्याला विचार पडला होता की अशा प्रकारचा चित्रपट कोण चांगल्या प्रकारे साकारू शकेल. त्यात ती अशी वेळ होती जेव्हा हा पाकिस्तान रिक्रेएट करण खूप कठीण होतं. कोणी आजवर पाकिस्तानला त्यांच्या चित्रपटाचा मोठा भाग असं काही केलं नव्हतं. त्यामुळे सनी देओल हा पहिली पसंती होता.' 


हेही वाचा : अरे कोण म्हणतंय 'गदर 2' सुपरहिट? पाहा कमाईचे खरेखुरे आकडे


सकीनाच्या भूमिकेसाठी अमीषा आधी कोणत्या अभिनेत्रींनी कास्टिंगसाठी विचारण्यात आले होते याविषयी देखील अनेक चर्चा सुरु होत्या. रिपोर्ट्सनुसार, काजोल, ऐश्वर्या राय बच्चन आणि माधुरी दीक्षित यांनी या चित्रपटासाठी नकार दिला होता. त्यानंतर अनिल शर्मा यांनी अमीषाला कास्ट केलं.