यशस्वी अभिनेता होण्याअगोदर ट्रेनमध्ये गायचा गाणं
बॉलिवूडमध्ये २०१२ साली आलेल्या `विकी डोनर` या सिनेमापासून करिअर सुरू केलेल्या आयुष्यमान खुराना आज एक यशस्वी अभिनेता आहे. आयुष्यमानची नुकतेच `बरेली की बर्फी` आणि `शुभमंगल सावधान` हे दोन सिनेमे प्रदर्शित झाले आहेत. आणि हे दोन्ही सिनेमे लोकांनी अतिशय पसंद केले आहेत.
मुंबई : बॉलिवूडमध्ये २०१२ साली आलेल्या 'विकी डोनर' या सिनेमापासून करिअर सुरू केलेल्या आयुष्यमान खुराना आज एक यशस्वी अभिनेता आहे. आयुष्यमानची नुकतेच 'बरेली की बर्फी' आणि 'शुभमंगल सावधान' हे दोन सिनेमे प्रदर्शित झाले आहेत. आणि हे दोन्ही सिनेमे लोकांनी अतिशय पसंद केले आहेत.
अभिनेत्यासोबतच आयुष्यमान एक दमदार सिंगर देखील आहे. एवढंच नाही तर तो मोठ मोठे शो देखील अतिशय उत्तमपणे होस्ट करतो. आयुष्यमान इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं नाव कमवण्यात अतिशय यशस्वी असला तरीही या अगोदर त्याने इथपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत.
हल्लीच एका मुलाखतीत त्याने सांगितलं आहे की, कॉलेजच्या दिवसांमध्ये दिल्ली ते मुंबई जाणाऱ्या एक्सप्रेस ट्रेनमध्ये गाणं गाऊन पैसे जमवत असे. मित्रांसोबत बाहेर जाण्यासाठी पैसे नसायचे ते पैसे मिळवण्यासाठी तो ट्रेनमध्ये गाणं गाऊन पैसे जमवून तो मित्रांसोबत गोव्याला जायचा. ढोल आणि गिटार घेऊन सेकंड क्लास कम्पार्टमेंटपासून ते फर्स्ट क्लासपर्यंत लोकांना गाणं ऐकवायचे. आज आयुष्यमानचे नाव इंटस्ट्रीतील टॉप टेन अभिनेत्यांमध्ये घेतले जाते. विक्की डोनरमध्ये अभिनयासोबतच आयुष्यमानने गाणे सुद्धा गायले होते आणि ते गाणे चांगलेच हिट ठरले होते.
शुभ मंगल सावधान मध्ये त्यांना त्यांने साकारलेली मुदित ही व्यक्तिरेखा चांगलीच हिट झाली आहे. आनंद एल राय दिग्दर्शित शुभ मंगल सावधान चित्रपटातील भूमी पेडणेकर आणि आयुष्मान खुराणाची जोडी प्रेक्षकांना आवडली आहे. तसेच बरेली की बर्फी हा चित्रपटदेखील बॉक्स ऑफिसवर गर्दी खेचून आणण्यास यशस्वी ठरला.