`या` कारणासाठी गोळा केली ट्विंकल खन्नाने अक्षय कुमारची Medical History;जाणून बसेल धक्का
अक्षय-ट्विंकलची पहिली भेट फिल्मफेयर मॅगझिनच्या शूटदरम्यान झाली होती. पहिल्या भेटीतच ट्विंकलला पाहताच अक्षय तिच्या प्रेमात पडला होता.
मुंबई : अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना १७ जानेवारी २००१ मध्ये लग्नबंधनात अडकले. अभिनेते राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांच्या मुलीला अक्षयने प्रपोज केलं होतं. राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया वेगळे झाले होते, मात्र मुलीच्या लग्नासाठी दोघेही एकत्र आले होते. अक्षय-ट्विंकलची पहिली भेट फिल्मफेयर मॅगझिनच्या शूटदरम्यान झाली होती. पहिल्या भेटीतच ट्विंकलला पाहताच अक्षय तिच्या प्रेमात पडला होता.
त्यानंतर या दोघांची पुन्हा एकदा 'इंटरनॅशनल खिलाडी'च्या शूटिंगदरम्यान भेट झाली. त्यानंतर मात्र दोघेही एकमेकांच्या प्रेमात होते.पण तुम्हाला माहित आहे या लग्नापूर्वी ट्विंकलने अक्षय कुमारची मेडिकल हिस्ट्री काढली होती. अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांच्या लव्हस्टोरी एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही. मुळात त्यांचे लग्न एका अटीवर झालं होतं.
एवढेच नाही तर ट्विंकल खन्नाने देखील एका मुलाखतीमध्ये त्यावेळी आम्ही एकमेकांबद्दल इतके गंभीर नव्हते असं सांगितले आहे. पण 'इंटरनॅशनल खिलाडी' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांनाही त्यांच्या प्रेमाची जाणीव झाली आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. याबाबत ट्विंकल खन्नाने तिची आई डिंपल कपाडिया यांच्याशी चर्चा केली.
डिंपल कपाडियांना वाटत होती ही भीती
जेव्ही ट्विंकल आणि अक्षय डिंपल यांच्याकडे गेले तेव्हा डिंपल कपाडियांना यांना वेगळीच भीती वाटत होती. डिंपल कपाडियाला अक्षय कुमार समलैंगिक वाटत होता. पण काही काळानंतर हा संभ्रम दूर झाला आणि दोघांनीही लग्न केलं.
ट्विंकल खन्नाने गोळा केली मेडिकल हिस्ट्री
यांच्या लग्नात नेहमीच कोणत्याना कोणत्या अडचणी येत होत्या. यासाठीच अक्षय कुमारशी लग्न करण्यापूर्वी ट्विंकल खन्नाने अक्षयची मेडिकल हिस्ट्री गोळा केली. या दोघांच्या लग्नात आणखी एक गोम होती आणि ती म्हणजे लग्नापूर्वी दोघांची कुंडली जुळत नव्हती.
एवढंच नाही तर खुद्द ट्विंकलनेही अक्षय कुमारला त्याच्या तब्येतीबाबत बरेच प्रश्न विचारले. ट्विंकल खन्नाने त्याच्या नातेवाईकांकडून वैद्यकीय हिस्ट्री देखील गोळा केला होती. ट्विंकलच्या या सर्व गोष्टींमुळे सुरुवातीला अक्षय कुमार आश्चर्यचकित झाला होता. पण, नंतर ट्विंकल बरोबर असल्याचं तिच्या लक्षात आलं.