निक आधी `या` विदेशी अभिनेत्याने प्रियांकाचा मागितला हात
प्रियांका चोप्रा सध्या ग्लोबल स्टार आहे
मुंबई : प्रियांका चोप्रा सध्या ग्लोबल स्टार आहे. तिची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे. देशातच नाही तर परदेशातही तिच्या चाहत्यांची कमी नाही. प्रियंका आता एका मुलाची आई देखील झाली आहे. मात्र निकच्या आधी आणखी एक परदेशी स्टार होता. ज्याला प्रियांकाचं वेड लागलं होतं. एवढंच नव्हेतर त्या अभिनेत्याने उघडपणे आपलं प्रेमही व्यक्त केलं होतं.
जेरार्डने केलं होतं प्रपोज
एका वृत्तानुसार, हॉलिवूड अभिनेता जेरार्ड बटलर प्रियांका चोप्राला दर अर्ध्या तासाने प्रपोज करायचा. दर अर्ध्या तासाने तो गुडघ्यावर बसून प्रियांकाला विचारायचा, 'माझ्याशी लग्न करशील का?' सूत्रांच्या माहितीनुसार, प्रियंका हसत हसत जेरार्डचा हा प्रस्ताव टाळायची. जेरार्ड 2009 मध्ये भारतात आला होता. यादरम्यान प्रियांका चोप्राने त्याच्यासाठी एक शानदार पार्टीही ठेवली होती. या पार्टीतही जेरार्डने प्रियांका चोप्राला प्रपोज केलं होतं.
2018 मध्ये केलं लग्न
प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांचा विवाह राजस्थानमधील जोधपूर येथे डिसेंबर २०१८ मध्ये झाला. उम्मेद भवन पॅलेसमध्ये दोघांनी हिंदू आणि ख्रिश्चन रितीरिवाजानुसार लग्न केलं. दोघांच्या लग्नाची खूप चर्चा झाली होती. ज्यात त्यांचे नातेवाईक आणि परदेशातील मित्रांनी हजेरी लावली होती. काही दिवसांपूर्वी प्रियांकाने एका गोंडस मुलीला सरोगेसीव्दारे जन्म दिला.