मुंबई : मृत्यू कधी कोणाच्या दारावर ठोठावतो हे कोणालाच कळत नाही. पण अनेकवेळा असे घडले आहे की अनेकजण मृत्यूच्या दारातून परतले आहेत. अशीच एक घटना सलमान खानसोबत घडली आहे. वाढदिवसापूर्वी शनिवारी रात्री उशिरा सलमान खानला साप चावला. मात्र सुदैवाने हा साप विषारी नव्हता आणि सलमानलाही तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती आता ठीक आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या अपघाताबाबात कळल्यानंतर त्यांच्या चाहत्यांमध्येही भीती नक्कीच होती. याआधी बॉलीवूडच्या काही सेलिब्रिटींसोबतही अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. ज्यातून ते थोडक्यात बचावले. 



अमिताभ बच्चन


1982 मध्ये कुली चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अमिताभ एका मोठ्या अपघाताचे बळी ठरले. सेटवर फाईट सीन करताना ते गंभीर जखमी झाले आणि त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. गंभीर स्थितीत त्यांना 59 दिवस ICU मध्ये दाखल करावे लागले. या घटनेदरम्यान, चाहते रात्रंदिवस अमिताभ यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत होते.



प्रीती झिंटा


प्रिती झिंटा दोनदा मरणाच्या दातातून बचावली आहे. पहिल्यांदा ती कोलंबोमध्ये एका कार्यक्रमात परफॉर्म करत असताना अगदी जवळ बॉम्बस्फोट झाला. दुसऱ्यांदा त्सुनामीचा तडाखा बसला तेव्हा ती थायलंडमध्ये सुट्टीवर गेली होती. दोन्ही वेळेस प्रीतीच्या नशिबाने साथ दिली आणि तिचे कोणतेही नुकसान झाले नाही.



हेमा मालिनी


हेमा मालिनी यांनीही मृत्यू जवळून पाहिला आहे. मथुरेतील हायवे पोलिस स्टेशनजवळ दोन वाहनांची टक्कर झाली जिथे हेमा मालिनीही होत्या. या भीषण धडकेत हेमा यांच्या कारचा एअरबॅक उघडला आणि या अपघातात त्या थोडक्यात बचावल्या. या अपघातात दोन वर्षांच्या मुलीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.



सनी लिओनी


सनी लिओनही या बाबतीत लकी असल्याचे सिद्ध झाले आहे. 2017 मध्ये, सनी विमान अपघातात थोडक्यात बचावल्याची बातमी तिने ट्विट करत दिली होती. तिने लिहिले- 'आमची विमान बस क्रॅश होणार होती आणि आता आम्ही सर्व महाराष्ट्रातील एका निर्जन भागात आहोत.' वास्तविक, विमानाच्या वैमानिकांनी परिस्थिती नियंत्रणात आणून योग्य निर्णय घेत विमान उतरवले.