मुंबई : गाण्यांकडे असणारा तरुणाईचा कल पाहता आता आणखी एक नवंकोरं गाणं, खरंतर प्रेमगीत प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 'बेखबर कशी तू' असे बोल असणाऱ्या या गाण्यात मराठमोळी अभिनेत्री संस्कृती बालगुडे हिचा अतिशय सुरेख अंदाज पाहायला मिळत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चॉकलेट बॉय म्हणून कलविश्वात फार कमी वेळातच आपली ओळख प्रस्थापित करणारा सुमेध मुदगलकर या गाण्यात संस्कृतीसोबत झळकत आहे. 


सेवन सीज मोशन पिक्चर्स आणि व्हिडीयो पॅलेस प्रस्तुत समीर परब आणि संतोष परब निर्मित ओमकार माने आणि जयपाल वाधवानी दिग्दर्शित ‘बेखबर कशी तू’ या अल्बममधील या गाण्याला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळत आहे. 


प्रेमगीतांच्या यादीत या गाण्याने आपलं असं वेगळं स्थांन मिळवलं आहे, असं म्हणायला हरकत नाही.  


गीतकार आशिष देशमुख आणि व्यान याने लिहिलेल्या ‘बेखबर कशी तू’ हे गाणं  व्यान याने संगीतबध्द केलं असून, युवा गायक रोहित राऊत याने ते गायलं आहे. 



गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आल्यानंतर अवघ्या काही तासांमघ्येच त्याला मिळणाऱ्या व्ह्यूजचा आकडा हा दिवसागणिक वाढतच आहे.