मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूर लवकरच 'बेल बॉटम' चित्रपटात 'अक्षय कुमार' सोबत दिसणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान ती सतत चर्चांमध्ये राहिली आणि अलीकडेच तिने आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात तिला बऱ्याच आर्थिक समस्यांना कसं तोंड द्यावं लागलं हे सांगितलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका अहवालानुसार वाणी कपूरने बॉलिवूडमधील तिच्या सुरुवातीच्या दिवसांविषयी आणि आर्थिक अडचणींबद्दल सांगितलं आहे. याचबरोबर तिने मॉडेलिंगद्वारे स्वतःला कशी मदत केली याबद्दलही सांगितलं आहे. वाणी कपूर म्हणाली, 'मी स्वतःला आधार देत होते, मी माझ्या पालकांकडून 18-19 वयापासून एक रुपयाही घेतला नाही.'


मॉडेलिंग करून कमवले पैसे 
वाणी कपूर म्हणाली, 'मी स्वत: ला मदत करायचे, मॉडेलिंगद्वारे पैसे कमवायचे. ही माझ्यासाठी खूप नवीन गोष्ट होती. मला कल्पना नव्हती. मला खूप आत्मविश्वास होता, मी काय करत आहे हे मला माहित नव्हतं. मला कसं पुढे जायचे हेही माहित नव्हतं. वाणी कपूर म्हणाली की, प्रत्येकाचा स्वतःचा दृष्टिकोन असतो. माझाही होता आणि मी त्या विश्वासावर अडकले.


स्वतःला कधीही कमी लेखू नका
अभिनेत्री म्हणाली, 'मी कधीही स्वतःला कमी लेखण्याचा प्रयत्न केला नाही, ही एकमेव गोष्ट होती ज्याबद्दल मी सुरुवातीपासूनच खूप आत्मविश्वास बाळगला होता. आर्थिक समस्या होत्या आणि बरंच काही घडलं. मी ज्या कुटुंबातून आले होते त्यातून मला अनेक विशेषाधिकार मिळाले नाहीत. माझे कुटुंबही चढ -उतारातून गेलं आहे, मला अभिमान आहे की मी स्वतःच्या गोष्टी स्वत: करु शकले आणि सक्सेस झाले.