पैसा वसूल सप्टेंबर! सत्य घटनेवर आधारित, बोल्ड अन् सेस्पेन्स-थ्रीलर Webseries
Best Webseries to Watch in September: या महिन्यातही प्रेक्षकांना ओटीटीवर वेबसिरिज आणि सिनेमांची पर्वणी पाहायला मिळणार आहे. तेव्हा चला तर मग पाहुया की या महिन्यात आपण कोणकोणत्या वेबसिरिज पाहू शकतो. जाणून घ्या लिस्ट एका क्लिकवर
Best Webseries to Watch in September: सध्याचा जमाना हा ओटीटीचा आहे. त्यामुळे आपल्यासाठी या सप्टेंबर महिन्यातही वेबसिरिजचा खजिना मिळणार आहे. यावेळी तुम्हाला हटके विषय, सेस्पेन्स-थ्रीलरचा मामला आणि तुम्हाला मनापासून आवडतील अशा आगळ्या आशयाच्या वेबसिरिज तुमच्या भेटीला येणार आहेत. 1 सप्टेंबरपासून ते 30 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला हटके वेबसिरिज पाहायला मिळणार आहेत. तेव्हा या लेखातून आपण जाणून घेणार आहोत या वेबसिरिज कोणत्या? त्या तुम्हाला कुठे पाहायला मिळतील? याबद्दल जाणून घेऊया.
1. Scam 2003 : The Telgi Story - ही वेबसिरिज सत्य घटनेवर आधारित असून या वेबसिरिजची सगळेच प्रेक्षक हे वाट पाहत होते. 2020 साली Scam 1992 ही वेबसिरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. यावेळी या वेबसिरिजनं प्रेक्षकांची प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. हंसल मेहता यांनी ही वेबसिरिज प्रदर्शित केली होती. 1992 साली हर्षद मेहतानं केलेल्या बॅंक रिसिप्टच्या स्कॅमवर ही सिरिज आधारित होती. तब्बल 5000 कोटींचा घोटाळा हर्षद मेहतानं केला होता. हा हर्षद मेहता कोण? त्यातून त्याला ही प्रेरणा कुठून मिळाली? तो कसा यात गुंतला त्यातून त्यानं इतरांना यात कसं गुंतवलं? याचा सर्व रोमांच आणणारा थरार यातून पाहायला मिळाला आहे.
कधी : 1 सप्टेंबर कुठे : SonyLiv
2. Haddi - नवाजुद्दीन सिद्दीकीचा 'हड्डी' हा आगळावेगळा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या वर्षभरापासून या चित्रपटाची तुफान चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. नवाजुद्दीन या चित्रपटातून स्त्री वेषात थोडक्यात ट्रान्सजेंडरच्या भुमिकेतून पाहायला मिळणार आहे. त्याच्या या चित्रपटाचा ट्रेलरही प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. यावेळी या चित्रपटातून नवाजुद्दीन आपल्याला वेगळ्या आणि आत्तापर्यंत कधीही न पाहिलेल्या भुमिकेतून दिसणार आहे. त्याच्या अभिनयाचे आपण सर्वच फॅन्स आहोत. त्यामुळे त्याच्याकडून प्रेक्षकांना फार अपेक्षाही आहेत.
कधी : 7 सप्टेंबर कुठे : ZEE5
3. 'बंबई मेरी जान' - आजकाल क्राईम ड्रामा असलेल्या वेबसिरिज या सोशल मीडियावर चांगल्याच व्हायरल होताना दिसत आहेत. त्यातून या पद्धतीच्या वेबसिरिज या गाजतानाही दिसत आहेत. 'बंबई मेरी जान' नावाची एक हटके आणि क्राईम ड्रामा पद्धतीची वेबसिरिज आहे. केके मेनन, अविनाश तिवारी, कृतिका कामरा, निवेदिता भट्टाचार्य, अमायरा दस्तूर अशी तगडी स्टारकास्ट आहे.
कधी : 14 सप्टेंबर कुठे : Prime Video
4. 'द फ्रीलांसर' - अनुपम खेर, मोहित रैना आणि काश्मीर परदेसी यांची द फ्रीलांसर ही वेबसिरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. यातूनही तुम्हाला वेगळ्या पद्धतीची स्टोरी पाहायला मिळेल.
कधी : 1 सप्टेंबर कुठे : Disney+ Hotstar
5. 'काला' - थ्रीलर वेबसिरिजही आजकाल फार उत्सुकतेने पाहिल्या जातात. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. यावेळी काला ही हटके वेबसिरिजही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
कधी : 15 सप्टेंबर कुठे : Disney+ Hotstar
सध्या बॉलिवूडमधून प्रेक्षकांना फार वेगळे आणि रोमांचक चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळाले आहेत. 'आदिपुरूष'च्या कॉन्ट्रोव्हर्सीनंतर दोन महिन्यात विविध चित्रपट हे प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा होती. त्यात Gadar 2, OMG 2, 'रॉकी और रानी की प्रेम कहानी', 'ड्रीम गर्ल 2' असे हटके सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले. खासकरून यावेळी सिक्वेल्स जास्त पाहायला मिळाले होते. ओटीटीवर आता प्रेक्षकांना तूफान मनोरंजनाची पर्वणी मिळणार आहे.