Bharat Jadhav on His Father: मराठी चित्रपटसृष्टीत भरत जाधव (Bharat Jadhav) हा सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता आहे. गेल्या दोन दशकाहून अधिक काळ भरत जाधवनं जगभरातील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. कुठल्याही कलाकाराचा संघर्ष हा सोप्पा नसतो. अभिनेता भरत जाधवचा संघर्षही काही सोप्पा नव्हता. अनेक तऱ्हेच्या कठीण प्रसंगांना तोंड देत भरत जाधव आज मराठीतला सुपरस्टार आहे. असा एक प्रसंग भरत जाधवनं आपल्या एका मुलाखतीदरम्यान शेअर केला होता. सध्या त्याच मुलाखतीतला (Bharat Jadhav Interview) एका भाग सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भरत जाधव आणि त्याच्या वडिलांचे एक अनोखे नाते आहे. परंतु असा एक प्रसंग घडला होता ज्यावेळी आपल्या वडिलांचा अपमान सहन न करता भरत जाधवनं तडक एक निर्णय घेतला होता ज्यापुढे त्याच्या वडिलांनी एक अट ठेवली होती. नक्की हा प्रसंग काय होता या लेखातून जाणून घेऊया.


मराठी चित्रपटसृष्टीतील भरत जाधव हे फक्त चित्रपटच नाही तर नाटक, मालिकांमधीलही एक मोठं नाव आहे. आपल्या यशात आपल्या (Bharat Jadhav Emotional on Father) आईवडिलांचेही मोलाचे योगदान आहे असं भरत जाधव नेहमीच आपल्या मुलाखतीतून सांगतो. 


काही वर्षांपुर्वी भरत जाधवनं दुरदर्शन सह्याद्री वाहिनीवरील दिवंगत अभिनेते विक्रम गोखले यांच्या 'दूसरी बाजू' या मुलाखतीच्या कार्यक्रमातून आपल्या वडिलांचा झालेला अपमान आणि त्यातूनही त्यांनी दाखवलेला खंबीरपणा याची एक आठवण सांगितली होती. यावेळी भरत जाधवनं सांगितले की त्याचे वडील मुंबईत टॅक्सीचालक होते. ते 1948 मध्ये मुंबईत येऊन स्थायिक झाले. मुंबईत आल्यानंतर त्यांनी टॅक्सी चालकाची नोकरी घेतली होता. त्त्या काळी त्यांना 100 रूपये मिळायचे. भरत जाधव जेव्हा त्यांच्या संघर्षाच्या काळात होते तेव्हा त्यांनी आपल्या वडिलांसोबतचा किस्सा सांगितला होता.


काय घडला होता किस्सा? 


ते म्हणाले की, ''एके दिवशी रात्री वडिलांनी विचारलं की तुझं नाटक शिवाजी मंदिरला होत का? तर मी सांगितलं हो''. त्यावेळेला भरत जाधव यांच्या वडिलांच्याच टॅक्सीमध्ये काही लोकं हे त्यांचेच नाटक पाहण्यासाठी शिवाजी मंदिरला जात होते. त्या नाटकाला काही कारणास्तव शिवाजी मंदिरच्या ठिकाणी पोहचायला उशीर झाला होता. त्यामुळे त्या प्रवाशांनी त्यांच्या वडिलांना प्रचंड शिव्या दिल्या. पण हे प्रेक्षक त्यांच्या मुलाच्याच नाटकाला जात आहेत हे पाहून मात्र त्यांचे वडील हे शांत बसले.


हेही वाचा - Gold Price Today: मोठी बातमी! शुद्ध सोनं आणखी महागलं; जाणून घ्या आजचे प्रतितोळा सोन्याचे दर


ते आपल्याच मुलाच्या नाटकाला जाण्यासाठी भांडत आहेत हे पाहून त्यांनी काहीच अवाक्षर काढलं नाही. त्यांनी शांतपणे लोकांच्या शिव्या ऐकल्या. परंतु वडिलांचा अपमान झालेला ऐकून एक मुलगा म्हणून भरत जाधव यांच्या ते जिव्हारी लागले होते. तेव्हा तातडीनं त्यांनी यापुढे टॅक्सी चालवू नका असे त्यांच्या वडिलांना सांगितले होते. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


सहा महिने टॅक्सी चाळीतच होती...


भरत जाधवच्या वडिलांना टॅक्सी चालवतं. दिवसाचे 100 रूपये मिळायचे तर भरत जाधवला एका नाटकाच्या शोचे 100 रूपये मिळायचे तेव्हा दिवसातून तीन शो केल्यावर घरात 300 रूपये येतील म्हणून आपल्या वडिलांनी टॅक्सी चालवू नये अशी विनंती भरत जाधव यांनी केली. परंतु यावर त्यांच्या वडिलांनी एक अट ठेवली. भरत जाधवच्या वडिलांना सांगितले होते की, ''मी टॅक्सी चालवणार नाही पण ती विकणार किंवा कोणाला देणारही नाही'', अशी अट ठेवली होती ते म्हणाली की, ''उद्या नाटकाचा भरवसा नाही. उद्या नाटक नाही चाललं तर काय करायचं अशी चिंताही त्यांना होती''. यानंतर सहा महिने टॅक्सी (Bharat Jadhav Father Taxi) चाळीत तशीच उभी होती असं भरत जाधवनं सांगितलं.