Bharat Jadhav on Laxmikant Berde: अभिनयातले देव म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. आजही आपण त्यांच्या आठवणी जाग्या करतो. त्यांच्या अभिनयाचे आपण आजही खूप चाहते (Laxmikant Berde Fans) आहोत. त्यांना रूपेरी पडद्यावर पाहणं हे आपल्या सर्वांसाठीच एक पर्वणी होती. आज ते आपल्यात नाहीत त्यामुळे आपल्यालाही त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. परंतु त्यांची आठवण आल्याशिवाय जसा एकही प्रेक्षक दु:खी होत नाही तसेच त्यांच्या मनापासून प्रेम करणारे आणि त्यांच्या अभिनयाचा आदर्श घेणारे आजच्या काळातले अभिनेतेही त्यांची आठवण काढल्याशिवाय राहत नाही. त्यातलाच आपला आवडता अभिनेता आहे तो म्हणजे भरत जाधव (Bharat Jadhav Instagram Post). गेली तीस वर्षे आपल्या अभिनयातून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणाऱ्या भरत जाधव यांचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. (Bharat Jadhav on Laxmikant berde Bharat Jadhav shares an emotional post goes viral pachadlela movie memory)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेते भरत जाधवही सोशल मीडियावर सक्रिय आहेत. ते अनेकदा खूप जुन्या आठवणी त्यांच्या इन्टाग्राम पेजवरून (Bharat Jadhav on Instagram) शेअर करताना दिसतात. कधी कुठली शूटिंग आठवण असेल किंवा कुठल्यातरी महत्त्वाच्या व्यक्तीबद्दल लिहिलायचे असेल तर तेव्हा भरत जाधव आपल्या इन्टाग्राम पोस्टवरून माहिती देतात. काही आठवड्यांपुर्वी त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यावर अशीच एक पोस्ट लिहिली होती जी सध्या व्हायरल होते आहे. काय लिहिलं होतं त्या पोस्टमध्ये चला जाणून घेऊया. 


काय आहे 'त्या' पोस्टमध्ये 


लक्ष्या मामा. खुप आठवणी आहेत. आम्हा नवोदितांना त्यांनी ज्या प्रकारे वेलकम केलं, आधार दिला... त्यांनी आपल स्टार पण आम्हाला कधी जाणवू दिलं नाही. त्यामुळेच आम्ही त्यांना मामा म्हणुन हाक मारू शकायचो. खुप काही शिकलो त्यांच्याकडून. त्यांच्याबद्दल सांगायची सगळयात मोठी आठवण म्हणजे पछाडलेला चित्रपट. 'सही रे सही' (Sahi Re Sahi) जोरात सुरू होत. अशातच जानेवारी 2003 ला महेश कोठारे सरांनी 'पछाडलेला' साठी विचारलं आणि त्यांना लगेच काम सुरू करायचं होत. मला त्या एका वर्षात ऑगस्ट 2003 पर्यंत सही चे जास्तीत जास्त प्रयोग करायचे होते त्यामूळे मी त्यांना नकार कळवला. मध्ये काही महिने गेले आणि सप्टेंबर च्या पहिल्या आठवड्यात लक्ष्या मामांचा फोन आला की, 'तुझं झालं का ते नाटकाचं वर्ल्ड रेकॉर्ड वगैरे. महेशला पटकन जाऊन भेट मी तुझ्यासाठी त्याला थांबवून ठेवलंय. तो पिक्चर सोडू नकोस.', असं भरत जाधवनं लिहिलं आहे. 


लक्ष्या मामा ओरडले म्हणून...


मग त्याच रात्री उशिरा महेश सरांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली आणि तिथून लक्ष्या मामांना कळवल की मी 'पछाडलेला' करतोय. सांगायचा मुद्दा हा की, इतका मोठा माणूस. कोणालाही घेऊ शकले असते. पण त्यांनी ती एवढी मोठी संधी मला दिली. 'पछाडलेला'ला मी त्यांचा आशीर्वाद मानतो.'



जर लक्ष्या मामा भरतला ओरडले नसते तर कदाचित भरतला 'पछाडलेला' मिळाला नसता आणि भरत नसता तर क्वचितच दुसरा अभिनेता त्याच्या इतक्या ताकदीने ती भूमिका साकारू शकला असता.