मुंबई : भारत देश विविध भाषा, संस्कृतींनी नटलेले देश आहे. आपल्या भारत देशाला शास्त्रीय नृत्याचा वारसा मिळाला आहे. आणि हा वारसा आताचे कलाकार त्याच ताकदीने पुढच्या पिढीला देताना दिसत आहे. एकुण ८ शस्त्रीय शैलींपैकी एक म्हणजे भरतनाट्यम. भरतनाटय़म हे मूळ दक्षिण भारतातील तामिळनाडू प्रांतातील नृत्य आहे. शास्त्रीय नृत्यात नर्तिकांप्रमाणे नर्तकांनीही आता बाजी मारली आहे. विशेष म्हणजे या नृत्यप्रकारात करिअर करण्याचा धाडसी निर्णय ही तरुण मुलं घेताना दिसता आहेत.  



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शास्त्रीय नृत्यकौशल्य आत्मसात केल्यास करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. याचा उत्तम दाखला एका व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही अनुभवू शकता. भारताच्या संस्कृतीचं दर्शन घेण्यासाठी अनेक पर्यटक आपल्या भारत देशात येतात. त्यांना आपल्या संस्कृतीचं दर्शन घडवण्यास तामिळनाडूच्या प्रभूचा खारीचा वाटा आहे. 


त्या ठिकाणाचं वैशिष्ट्य सांगत तो आपल्या कलेचं सादरीकरण करून पर्यटन आणि शास्त्रीय नृत्य या दोन्ही गोष्टींना दुजोरा देताना दिसत आहे. आता नृत्य ही कला फक्त आवडीसाठी मर्यादित राहिली नसून या शैलीच्या माध्यमातून करिअरच्या अनेक संधी देखील उपलब्ध होताना दिसत आहेत.