भारतीने दिला बाळाला जन्म! कॉमेडियनकडून पहिली प्रतिक्रिया
भारतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून आई होणार असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांना दिली, पण आता तर ती...
मुंबई : कॉमेडियन भारती सिंग सध्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहे. भारतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून आई होणार असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांना दिली. आता भारतीने एका गोंडस मुलीला जन्म दिला असल्याची चर्चा रंगत आहे. पण भारतीने रंगणाऱ्या चर्चांना पूर्ण विराम देत, अद्याप आई झाली नसल्याचा खुलासा केला आहे. एवढंच नाही तर अफवांवर विश्वास ठेवू नका असं देखील ती म्हणाली आहे.
भारती म्हणाली, 'मी मुलीला जन्म दिलेला नाही. पण आता तारीख जवळ आली आहे. त्यामुळे मला थोडी भीती वाटत आहे. हर्ष मला कायम विचारतो आपलं बाळ कसं असेल...'
'बाळ कसं असेल सांगता येत नाही, पण ते नक्कीचं विनोदी असेल... कारण बाळाचे आई-वडील दोघे विनोदी आहेत...' काही दिवसांपू्र्वी भारतीने मॅटरनिटीचे फोटो शेअर केले.
हर्षसोबत भारतीचे फोटो तुफान व्हायरल झाले. चाहत्यांनी दोघांनी शुभेच्छा देखील दिल्या. आता भारती कधी आनंदाची बातमी देते याकडे चाहते आणि कुटुंबाचं लक्ष आहे.