Bharti Singh Admitted in Hospital : लोकप्रिय कॉमेडियन भारती सिंहला रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या तीन दिवसांपासून भारतीच्या पोटात दुखत होते. तिने सुरुवातीला गॅस्ट्रोचा त्रास होत असल्याचे समजून दुर्लक्ष केले होते. आता भारतीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून लवकरच तिच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. भारतीने एका व्हिडीओद्वारे तिच्या प्रकृतीची माहिती चाहत्यांना दिली आहे. 


भारतीने मागितली चाहत्यांची माफी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारती सिंहने नुकतंच तिच्या युट्यूबवर एक व्हिडीओ अपलोड केला आहे. या व्हिडीओत भारती सिंह ही रुग्णालयात दाखल झाल्याचे दिसत आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला भारतीने तिच्या चाहत्यांची माफी मागितली आहे. यावेळी ती म्हणाली, "मला खरंच माफ करा. खरंतर अशा परिस्थितीत व्हिडीओ शेअर करणे बरोबर वाटत नाही. पण मी अजून काहीही करु शकत नाही. मी हा व्हिडीओ करण्यामागे एक कारण आहे." 


तात्काळ ऑपरेशन करणे गरजेचे


"मला गेल्या 3 दिवसांपासून खूप त्रास होत आहे. मला आधी वाटलं की फूड पॉइजनिंग झालं आहे. पण हे दुखणं इतकं वाढलं की मला रुग्णालयात दाखल करावं लागलं. रुग्णालयात माझ्या खूप चाचण्याही करण्यात आल्या. तेव्हा मला समजलं की माझ्या पित्ताशयात खडे झाले आहेत आणि त्याचे तात्काळ ऑपरेशन करणे गरजेचे आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, माझ्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करावी लागेल", असे सांगण्यात आले होते. 



डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार माझ्या पोटदुखीचा त्रास वाढत होता. त्यामुळे मला त्रास होत होता. मी काहीही खाल्लं तरीही माझ्या पोटात दुखते आणि उल्टी होते. यानंतर केलेल्या चाचणीत पित्ताशयात खडे झाल्याची माहिती समोर आली, असे भारतीने या व्हिडीओत सांगितले आहे. हे खडे काढण्यासाठी शस्त्रक्रिया केली जात आहे. भारती सिंहची शस्त्रक्रिया ही कोकिलाबेन रुग्णालयात पार पडत आहे. 


लवकरच मिळणार रुग्णालयातून डिस्चार्ज


दरम्यान भारती सिंहसोबत तिचा पती हर्षही रुग्णालयात उपस्थित आहे. भारती ही पहिल्यांदाच तिचा मुलगा लक्ष्यशिवाय इतके दिवस राहिली आहे. ती या व्हिडीओत भावूक झाल्याचे पाहायला मिळत आहे. भारतीच्या प्रकृतीची माहिती मिळताच तिच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच ती लवकर बरी व्हावी यासाठी चाहत्यांकडून प्रार्थनाही केली जात आहे. आता भारतीची प्रकृती ठीक असून तिला लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे.