Bharati singh च्या मुलाचं खर नाव अखेर समोर
भारती सिंगच्या मुलाचं नाव प्रचंड खास... जाणून घ्या काय आहे कॅमेडियनच्या मुलाचं नाव
मुंबई : प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंग नुकताच आई झाली आहे. तिने एका मुलाला जन्म दिला आहे. मुलाच्या जन्मानंतर भारती आणि पती हर्ष लिंबाचिया प्रचंड आनंदी आहेत. दोघांच्या कुटुंबात देखील उत्साहाचं वातावरण आहे. मुलाच्या जन्मानंतर फक्त सेलिब्रिटींनीचं नाही, तर चाहत्यांनी देखील भरती आणि हर्षला शुभेच्छा दिल्या. प्रत्येकाला भारतीच्या मुलाची पहिली झलक पाहायची आहे. पण भरतीने अद्याप मुलाचा फोटो चाहत्यांसोबत शेअर केलेला नाही.
सुरुवातीला भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांनी सांगितले होते की ते आपल्या मुलाला प्रेमाने गोला म्हणतात, परंतु दोघांनी त्यांच्या मुलाचं नाव सर्वांना सांगितलं आहे. अखेर भारतीच्या मुलाचं नाव समोर आलं आहे.
ईटाईम्सच्या रिपोर्टनुसार, तिच्या एका व्हिडीओमध्ये भारती म्हणते, आमचा मुलगा फार लहान पणापासून त्याच्या आई-वडिलांना काम करताना पाहत आहे. 'लक्ष्य' जन्माला येण्यापूर्वीचं काम करत होता. भारतीच्या या वक्यव्यानंतर स्पष्ट झालं आहे की, तिने 'लक्ष्य' ठेवलं आहे. भारती आणि हर्ष त्यांच्या मुलाला लाडाने गोला म्हणतात.
मुलाला गोला का म्हणताता भारती आणि हर्ष?
खुद्द भारतीने या गोष्टीचा खुलासा केला आहे. भारतीचा मुलगा मस्त गोलमटोर आहे. भारतीच्या गोंडस मुलाला पाहाताचं प्रत्येक जण प्रेमात पडेल. जेव्हा भारतीने पहिल्यांदा मुलाला पाहिलं तेव्हा तिच्या मनात गोला नाव आलं.
तेव्हापासून भारती आणि हर्ष मुलाला गोला म्हणून हाक मारतात. गोला नावाचा अर्थ नदी असाही होतो. हे एक हिंदू नाव आहे.