मुंबई : आज आपले दुःख, ताण-तणाव विसरवण्यास मदत करणारी कॉमेडियन भारती सिंहने ऐकीकाळी अनेक वाईट प्रसंगांचा सामना केला . करियरच्या सुरूवातीला अनेक वाईट प्रसंग अनुभवलेली भारती आज एक प्रसिद्ध सेलिब्रिटींपैकी एक आहे. अनेक वर्षांनंतर भारती त्या वाईट प्रसंगाबाबत उघडपण बोलली आहे. करियरच्या सुरूवातीला भारती प्रत्येक शोमध्ये तिच्या आईला घेवून जायची. यामागे एक मोठं कारण आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनिष पॉलला दिलेल्या एका मुलाखतीत भारतीने तिच्या खासगी आयुष्यातील अशा अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. जेव्हा भरती शोसाठी स्टेजवर पोहोचायची तेव्हा लोक तिला विचित्र स्पर्ष करायचे. पण तेव्हा यासर्व गोष्टी तिला कळत नव्हत्या. तिला माहिती नसायचं की तिच्यासोबत काय होत आहे. 



त्यानंतर भारती तिच्या आईला घेवून जायची. तेव्हा तेथील लोक तिच्या आईला दिलासा द्यायचे आणि म्हणायचे आम्ही भारतीची काळजी घेवू. पण तेव्हा भारतीला कळत नव्हत लोक तिला विचित्र स्पर्ष करायचे. भारती म्हणाली, 'मला मॉर्डन गोष्टींबद्दल एवढं माहित नव्हतं. कुणीतरी माझ्या कमरेवर हाताने स्पर्श केला. मला कल्पनाही नव्हती की मुलींसाठी हा वाईट स्पर्श असतो.'


पुढे भारती म्हणाली , 'तेव्हा मला समज नव्हती.  पण आता सर्व गोष्टी माझ्या लक्षात येतात. मी या सर्व गोष्टींविरोधात आवाज देखील उचलू शकते. माझ्यामध्ये आता ती हिंमत आली आहे. प्रत्येक महिलेला देवाने एक शक्ती दिली आहे ज्यामुळे तिला समोरच्या व्यक्तीचा उद्देश लक्षात येतो. ' असं देखील भारती म्हणाली.