बाळाच्या जन्माआधीच पती बोलून गेला मोठी गोष्ट, ऐकून भारतीच्या चेहऱ्यावरचा उडाला रंग!
कॉमेडियन भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया पहिल्यांदाच पालक बनणार आहेत.
मुंबई : कॉमेडियन भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया पहिल्यांदाच पालक बनणार आहेत. अलीकडेच भारती सिंगने तिच्या गरोदरपणाच्या आनंदाची बातमी चाहत्यांना सांगितली. तेव्हापासून कॉमेडियन सतत चर्चेत आहे. पहिल्या मुलाच्या जन्मापूर्वीच हर्ष लिंबाचियाने भारतीच्या गरोदरपणाबद्दल बरंच काही सांगितलं आहे. हर्षचं बोलणे ऐकून भारती स्तब्ध झाली.
भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कॉमेडियनचा नवरा म्हणतोय की, 'इतकी मजा आहे की आता ती दरवर्षी प्रेग्नंट राहणार आहे.' हर्षचे हे ऐकून भारती सिंगच्या चेहऱ्याचा रंगच बदलून जातो, ती हर्षकडे पाहते आणि मग मजेशीरपणे म्हणते, हो मी खूप फ्रि आहे की फक्त हेच काम आहे...
भारती सिंह आणि हर्ष लिंबाचियाचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये भारती पुष्पाची अॅक्शन करताना दिसत आहे. भारती पापाराझींसमोर 'मैं रुकेगा नहीं' हा प्रसिद्ध डायलॉग बोलते. भारतीनंतर तिचा नवरा हर्ष व्हिडिओमध्ये म्हणतो, 'मी थांबणार नाही...पुढच्या वर्षी अजून एक देणार...' हर्ष लिंबाचियाचं हे बोलणं ऐकून सगळे हसायला लागतात, तर भारती हर्षकडे बघते आणि हसते आणि चकित होऊन बघायला लागते.
भारती सिंग तिच्या पहिल्या प्रेग्नंसीच्या टप्प्याचा आनंद घेत आहे. भारती गरोदरपणात सतत काम करत असते. ती कलर्स टीव्हीचा रियालिटी शो हुनरबाज: देश की शान में पती हर्ष लिंबाचियासोबत होस्ट करत आहे. भारती सिंग या वर्षी एप्रिलमध्ये मुलाला जन्म देणार आहे.