Bharti Singh-Haarsh Limbachiyaa New Car : छोट्या पडद्यावरील सर्वात पहिली कॉमेडिअन म्हणून भारती सिंहला ओळखले जाते. ती घराघरात लोकप्रिय आहे. कॉमेडी क्वीन म्हणून ओळखली जाणारी भारती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ते अनेकदा व्हिडीओ आणि फोटो शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. तसेच ती तिच्या युट्यूब चॅनलवर दररोज व्लॉग शेअर करतानाही दिसते. आता भारती सिंहचा पती हर्ष लिंबाचियाने चाहत्यांना एक गुड्यूज दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारती सिंहचा पती आणि अभिनेता हर्ष लिंबाचिया त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने नवीन गाडी खरेदी केल्याचे सांगितले आहे. या पोस्टसोबत त्याने एक फोटोदेखील शेअर केला आहे. या फोटोत हर्ष हा त्याच्या नवीन गाडीकडे प्रेमाने पाहताना दिसत आहे. या फोटोला कॅप्शन देताना त्याने "माझी नवीन गाडी आता माझ्या आनंदाचे नवे ठिकाण" असे म्हटले आहे. हर्षने खरेदी केलेल्या या गाडीची किंमत कोट्यावधींच्या घरात आहे. 



हर्ष लिंबाचियाच्या नव्या गाडीची किंमत काय?


हर्षने नवीन गाडी खरेदी केल्यानंतर चाहत्यांसह अनेक कलाकार त्याला शुभेच्छा देताना दिसत आहेत. हर्षच्या या पोस्टवर अभिनेत्री जस्मिनने वॉव, अभिनंदन अशी कमेंट केली आहे. तर प्रतिक सेजपालने खूप खूप अभिनंदन भावा असे म्हटले आहे. तसेच अली गोनी, राहुल शेट्टी, राणी चॅटर्जी, विक्रांत सिंह, गौरव दुबे या कलाकारांनीही हर्षला शुभेच्छा दिल्या आहेत. 


हर्ष लिंबाचियाने Mercedes-Benz GLS ही गाडी खरेदी केली आहे. या गाडीत अनेक अत्याधुनिक सुविधा आहेत. हर्षने खरेदी केलेल्या नव्या गाडीची किंमत 1.51 कोटी रुपये आहे. 


दरम्यान भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांनी ‘डान्स दिवाने’, ‘हुनरबाज: देश की शान’ आणि ‘द खतरा शो’ यांसारख्या कार्यक्रमांसह इतर काही रिअलिटी शोदेखील एकत्र होस्ट केले आहेत. त्यासोबत भारती ही ‘सा रे ग मा प लिटिल चॅम्प्स’ या रिअॅलिटी शोमध्येही झळकणार आहे. तर दुसरीकडे कपिल शर्माचा 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो' नेटफ्लिक्स ओटीटी प्लॅटफॉर्मवर आजपासून प्रदर्शित होणार आहे. या कार्यक्रमात भारती सिंह झळकणार की नाही, याबद्दल अद्याप माहिती समोर आलेली नाही. पण एका मुलाखतीदरम्यान तिने जर मला निर्मात्यांचा फोन आला, तर मी नक्कीच या कार्यक्रमाचा भाग असेन, असे म्हटले होते.