मुंबई : प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंग नुकतीच आई झाली आहे. तिने एका मुलाला जन्म दिला आहे. भारती आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया आपल्या मुलाला गोला असे प्रेमाने हाक मारतात. भारती सिंहने अनेकदा सांगितलं आहे, की तिला मुलगी हवी आहे. पण तिने मुलाला जन्म दिला आहे. आता भरतीने दुसऱ्या बाळाबद्दल मोठी घोषणा केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीने 'द खतरा-खतरा शो' दरम्यान पापाराझींसोबत संवाद साधला, यावेळी ती म्हणाली, 'गोलाला आता एक बहीण हवी आहे.' एवढंच नाही तर तिने दुसऱ्या बाळाबद्दल आणि दोन मुलांमध्ये हव्या असणाऱ्या अंतराबद्दल सांगितलं आहे. 



भारती म्हणाली, 'मुलगी असावी असं माझंही मत आहे. मुलांमध्ये दोन वर्षांचे अंतर असावं, भाऊ असेल तर बहीण असावी आणि बहीण असेल तर भाऊ असावा.' एवढंच नाही तर, भारतीने मुलाची पहिली झलक कधी दाखवणार हे देखील सांगितलं आहे. 


मुलाच्या फोटोंबद्दल भारती म्हणाली, 'मी पहिल्या दिवशीचं गोलाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले असते. पण घरातील काही वरिष्ठ व्यक्तींचा नकार आहे. त्यामुळे 40 दिवस झाल्यानंतर गोलाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करेल..'


भारतीच्या वक्तव्यानंतर तिच्या मुलाची पहिली झलक लवकरचं सर्वांसमोर येणार आहे. मुलाच्या जन्मानंतर भारती सतत चर्चेचा विषय ठरत आहे.