मुंबई : चला हवा येऊ द्या' या (Chala Hawa Yeu Dya) कॉमेडी शोने गेल्या काही वर्षात प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलं.  भाऊ हा मराठी इंडस्ट्रीतला असा हिरो आहे ज्याने सुरुवातीच्या दिवसांत खूप संघर्ष केला.भाऊ कदम याचं फॅन फॉलोईंग जबरदस्त आहे. सोशल मीडियावरही अभिनेता कायम सक्रिय असतो. या कॉमेडी अभिनेत्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. जो स्वत: त्याने शेअर केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाऊ यांनी लोकांचं खूप मनोरंजन केलं, भाऊ प्रोफेशनल आयुष्याप्रमा त्यांच्या पर्सनल आयुष्यामुळेही नेहमीच चर्चत असतात. आणि आज ते त्यांच्या अभिनयाच्या जोरावर उंचीच्या शिखरावर पोहचले आहेत.  चला हवा येऊ द्या' या कॉमेडी शो च्या माध्यमातून भाऊ कदम (Bhau Kadam) घराघरात पोहचले आहेत. भाऊ यांनी आतापर्यंत उभ्या महाराष्ट्रांचं भरभरुन मनोरंजन केलंय. 


सध्या भाऊ यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये भाऊंची मुलगी दिसत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये ती बोलताना दिसतेय की, ''मी ट्राय केलेलं लेटर लिहायचं पप्पांना... पण ते पेपरावर लिहीताच आलं नाही. माहित नाही का? आतापर्यंत खूप लेटर्स लिहीलेत, पण ते सोप्प वाटत होत. 


बऱ्याचदा आईवर लिहीयाला सांगितलं जातं. पण बाबांवर लिहा असं कोणी सांगितलं नाही. बाबांविषयी खूप कमी विचारलं जातं. आज खूप अभिमान वाटतो.  की तु बाबांसारखी आहेस, थँक्यू आणि सॉरी कधी चुकली असेन तर, आज जे आहे आज तिथे उभी आहे. कारण आज कधीही कुठेही बाहेर गेले तरी विचारतात लोकं की, तु त्यांची मुलगी आहेस तेव्हा खूप अभिमान वाटतो.''


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


यानंतर भाऊ यांची मुलगी त्यांना मिठी मारते आणि ढसाढसा रडू लागते. त्यानंतर या व्हिडिओमध्ये त्यांचा ५० वा वाढदिवस साजरा करताना दिसतायेत. हा व्हिडिओ भाऊ कदम यांच्या ५० व्या वाढदिवसा निमीत्ताचा आहे. जो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्यांची पुर्ण फॅमिलीही दिसत आहे. या व्हडिओमध्येही भाऊ यांचा साधेपणाला मनाला भावतो. भाऊ कदम यांची मुलगी मृण्मयी कदम ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचं फॅन फॉलोईंगही जबरस्त आहे. याचबरोबर तिचा यूट्यूब चॅनल देखील आहे. ती तिचे व्लॉग्सही नेहमी शेअर करत असते.