मुंबई : 'चला हवा येऊ द्या' या (Chala Hawa Yeu Dya) कॉमेडी शोने गेल्या काही वर्षात प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलं. या कॉमेडी शो च्या माध्यमातून भाऊ कदम (Bhau Kadam) घराघरात पोहचला आहे. भाऊने आतापर्यंत उभ्या महाराष्ट्रांचं भरभरुन मनोरंजन केलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्याने खळखळून लोकांचं मनोरंजन केलं, भाऊ प्रोफेशनल आयुष्याप्रमा त्याच्या पर्सनल आयुष्यामुळेही नेहमीच चर्चत असतो. भाऊ हा मराठी इंडस्ट्रीतला असा हिरो आहे ज्याने सुरुवातीच्या दिवसांत खूप संघर्ष केला आणि आज तो त्याच्या अभिनयाच्या जोरावर उंचीच्या शिखरावर पोहचला आहे. आज आम्ही तुम्हाला भाऊ कदमविषयी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहोत. 


भाऊ कदमचा जन्म १२ जून १९७२ साली मुंबईत झाला. मात्र भाऊचं गाव कोकणातील कणकवली आहे. त्यांचं बालपण हे वडाळा परिसरातील बीपीटी क्वॉटर्समध्ये गेलं. वडाळा येथील ज्ञानेश्वर विद्यालयातून भाऊने आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं. वडिलांच्या मृत्यूनंतर ते आपल्या कुटुंबासह वडाळ्यातून डोंबिवलीत स्थायिक झाला. भाऊ लहानपणापासून खूप शांत स्वभावाचा आहे. पण लोणावळामध्ये भाऊ कदम यांचं एक अलिशान फार्म हाऊस आहे. ज्याचा एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 


पाहा व्हिडिओ



भाऊ कदमचं खरं नाव भालचंद्र कदम( Bhalchandra Kadam) आहे. महाराष्टातील लोकांना आपल्या अभिनयातून हसवणारा भाऊ कदम हा एक मराठी रंगभूमी आणि चित्रपट अभिनेता आहे आणि प्रसिद्ध विनोदवीर आहेत.


१९९१ मध्ये त्यांनी नाटकांतून अभिनय करण्यास सुरुवात केली, तेव्हापासून त्यांची अभिनय कारकीर्दीची सुरुवात झाली.  त्यांची लोकप्रियता झी मराठी वाहिनावरील 'फू बाई फूच्या' या  टीव्ही कार्यक्रमातून झाली त्यांनी मराठी सोबत हिंदी चित्रपटात देखील अभिनय केला आहे. ५०० पेक्षा अधिक नाटके, नऊ पेक्षा जास्त मालिका आणि चित्रपटात अभिनय केला आहे. झी मराठीवर चला हवा येऊ द्या' या विनोदी कार्यक्रमात भाऊ कदम पप्पा, ज्योतिषी, प्रणम्य डिजिटल आणि बर्‍याच पात्रांची व्यक्तिरेखा साकारल्या आहेत.