मुंबई : मराठी कॉमेडी किंग भाऊ कदम सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. आपल्या परफेक्ट कॉमेडी टायमिंगने त्याने प्रेक्षकांटची मने जिंकली आहेत. फू बा फू या शोमधून तो नावारुपाला आला. तर चला हवा येऊ द्या या शोमधून तो घरा-घरात पोहोचला. आज भाऊ मराठीतील एक आघाडीचा कॉमेडी अभिनेता आहे.भाऊने चाळी ते अलिशान फ्लॅट असा प्रवास केला आहे. आज आम्ही तुम्हाला भाऊच्या अलिशान घराची सफर घडवणार आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाऊ कदमची मोठी लेक मृण्मयी कदम ही प्रसिद्ध यूट्यूबर आहे. ती तिच्या चॅनलवर वेग वेगळ्या विषयावर व्लॉग्स बनवत असते. तिचे व्लॉग बहूतेक, फशन. ट्रॅव्हल आणि लाईफ स्टाईलवर असतात. काहि दिववसांपूर्वी मृण्मयीने तिच्या वाढदिवासानिमीत्त एक व्लॉग बनवला होता. ज्यात तिने तिच्या घराची एक झलक दाखवली आहे. चाळीत राहणाऱ्या भाऊच्या या घराची ओळख खूप खास आहे. व्हिडिओच्या माध्यमातून तिने घराची एक सफर घडवली आहे. लिव्हिंग रूमपासून तिने व्हिडिओची सुरुवात केली आहे.


त्याच्या लिवींग रुममध्ये घराला साजेसा असा सुंदर सोफा आहे. सोफ्याच्या वर खूप छान अशी वॉल पेंटींग आहे. तसंच भिंतींना खूप सिंपल असा पांढरा रंग देण्यात आला आहे. आणि त्यावर गुलाबी रंगाचं वॉल पेंटीग घराची शोभा वाढवत आहे.. सफेद रंग असल्यामुळे कोणत्याही रंगाच इंटिरिअर शोभून दिसतं. या घराचा लूक पुर्ण करण्यासाठई  भाऊने ब्राऊन रंगांच्या पडद्यांची निवड केली आहे.


भाऊ कदमच्या घरी गौतम बुद्धांची एक आकर्षक मूर्तीदेखील आहे. घराच्या लिविंग एरियामध्ये बुद्धांची आकर्षक मूर्ती आहे. संपूर्ण काळ्या रंगाची मनमोहक मूर्ती लक्ष वेधून घेते. याचबरोबर भाऊच्या घराची सजावट करण्यासाठी सुंदर फोटो फ्रेम किंवा मूर्ती ठेवल्या आहेत. यामुळे घराची अधिक शोभा वाढवत आहे. भाऊ कदम यांच्या आईची एक खोली आहे आणि मुलांची एक वेगळी खोली आहे. तसंच हे घरं खूप साधं पण सुंदर बनवण्यात आलं आहे.  याचबरोबर या घरात आरामदायी गोष्टी आणि रंगसंगती यांचा जास्त विचार केला आहे.



'चला हवा येऊ द्या' या (Chala Hawa Yeu Dya) कॉमेडी शोने गेल्या काही वर्षात प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलं. भाऊ हा मराठी इंडस्ट्रीतला असा हिरो आहे ज्याने सुरुवातीच्या दिवसांत खूप संघर्ष केला आणि आज तो त्याच्या अभिनयाच्या जोरावर उंचीच्या शिखरावर पोहचला आहे. या कॉमेडी शो च्या माध्यमातून भाऊ कदम (Bhau Kadam) घराघरात पोहचला आहे. भाऊने आतापर्यंत उभ्या महाराष्ट्रांचं भरभरुन मनोरंजन केलंय.