मुंबई : बॉलिवूडमध्ये एन्ट्री मिळावी ही प्रत्येक कलाकाराची इच्छा असते. प्रत्येक कलाकार यासाठी धडपड असतो. आपलं छोट काम देखील कुणीतरी पाहावं आणि त्याने आपल्याला बॉलिवूडमध्ये काम मिळवून देण्यास प्रयत्न करावा ही प्रत्येकाची इच्छा असते. असं असताना अनेक टीव्ही मालिका जवळपास 15 प्रादेशिक भाषेते केलेल्या सिनेमांमधून आता या अभिनेत्रीला डायरेक्ट बॉलिवूडमध्ये एन्ट्री मिळाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भोजपुरी सिनेमातील लोकप्रिय अभिनेत्री अर्चना प्रजापतिला बॉलिवूडमध्ये एन्ट्री मिळाली आहे. Zee News Digital शी बोलताना अर्चनाने सांगितलं की, ही गोष्ट खरी आहे की मला बॉलिवूडमध्ये काम मिळालं आहे. 'है तुझे सलाम इंडिया' या सिनेमांत मला सेकेंड लीड रोलम मिळाला आहे. मी या सिनेमासाठी ऑडिशन दिलं होतं. जे अगदी उत्तम झालं असून हा सिनेमा आता ऑक्टोबरमध्ये रिलीज होणार आहे. 



अर्चना प्रजापती ही भोजपुरी सिनेमांतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. या अगोदरही बॉलिवूडमध्ये अर्चनाने अनेक म्युझिक अल्बमध्ये काम केलं आहे. मात्र आता तिने बॉलिवूड सारख्या मोठ्या पडद्यावर सेकेंड रोल करायची संधी मिळाली आहे. 'है तुझे सलाम इंडिया' या सिनेमांत ती एका पत्रकाराची भूमिका साकारत आहे. छोट्या पडद्यावरून सुरू केलेला हा प्रवास काही सामान्य नव्हता. अनेक समस्यांशी दोन हात करत ती इतवर पोहोचली आहे. 




अर्चना मुळची उत्तर प्रदेशच्या गोरखपुरची असली तरीही तिचा जन्म मुंबईचा आहे. ती लहानपणापासून आपल्या कुटुंबासोबत मुंबईत राहते. लवकरच अर्चना भोजपुरीत मेरी जान तिरंगा या सिनेमांतून देखील दिसणार आहे. सुरूवातीच्या काळात अर्चनाच्या कुटुंबियांचा तिच्या या करिअरला विरोध होता. मात्र आता ते तिच्यासोबत खंबीरपणे उभे आहेत.