मुंबई : भोजपुरी सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्री प्रियंका पंडित तिच्या बोल्ड आणि आकर्षक स्टाईलमुळे बर्‍याचदा चर्चेत असते. तिच्या अभिनयाबरोबरच तिच्या लुकचंही चाहत्यांना वेड लागलं आहे. प्रियंका पंडित उर्फ गार्गी पंडित ही भोजपुरी सिनेमाच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे, त्यामुळे तिची फॅन फॉलोईंगही खूप जास्त आहे. प्रियंका सोशल मीडियावरही खूप अ‍ॅक्टिव्ह असते, म्हणूनच तिचे 6 लाखाहून अधिक इन्स्टाग्राम फॉलोअर्स आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रियंकाच्या फोटोवर अश्लील कमेंट्स
नुकतीच प्रियंका पंडितने आपल्या इंस्टाग्रामवर एक बोल्ड फोटो पोस्ट केला असून, त्या फोटोमुळे सोशल मीडियावर तिची चांगलीच चर्चा आहे. प्रियंकाने हा फोटो शेअर करत अध्यात्मिक गुरु ओशो यांचे विचार कॅप्शनमध्ये लिहिले आहेत. तिचं कॅप्शन अश्लीलतेवर भाष्य करणारं आहे.


प्रियंकाने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "अश्लीलता हा आपला स्वतःचा शोध आहे, देवाचा नाही. जर हा शोध देवाचा असता तर त्याने आपल्याला कपडे परिधान करुन पाठवलं असतं- ओशो"
काही लोक प्रियांकाच्या या फोटोला आणि तिच्या कॅप्शनला पाठिंबा देत असले तरी असे बरेच लोक आहेत, जे या कॅप्शनवर आणि प्रियांकाच्या या फोटोवर टीका करत आहेत आणि कमेंन्ट्स बॉक्समध्ये अश्लील कमेंन्ट करत आहेत.



प्रियांका पंडित वादात अडकल्याची ही काही पहिली वेळ नाही. काही दिवसांपूर्वी तिने इंस्टाग्रामवर एक मजेदार व्हिडिओ पोस्ट केला होता ज्यामध्ये ती एका माणसाबरोबर झोपलेली दिसतं आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर तिच्यावर नेटकऱ्यांनी गलिच्छ कमेंन्टचा वर्षाव केला होता



अभिनेत्रीचा कथित एमएमएस व्हायरल झाला
प्रियांका तिच्या सिनेमांविषयी आणि अभिनयाविषयी जेवढी चर्चेत असते, तशीच ती बर्‍याचदा वादाच्या भोवऱ्यात देखील असते. काही काळापूर्वी प्रियांकाच्या नावावर असणारा अश्लील एमएमएस  देखील व्हायरल होत होता.


गेल्या वर्षी फीफाफूज या युट्यूब वाहिनीवरील व्हिडिओनुसार, जेव्हा ती या एमएमएस संदर्भात बोलली तेव्हा, तिने व्हिडिओमध्ये आपणं नसल्याचं सांगितलं होतं. व्हिडिओमध्ये पाहिली गेलेली मुलगी कोणीतरी दुसरीच आहे. पुढे प्रियंका म्हणाली की, कोणीतरी तिच्यावर दुश्मनी घेतं आहे. तिने याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार देखील केली होती.