या रिक्षावाल्याला यूट्यूबवर ५ कोटी हिट्स
भोजपुरी चित्रपटाची उत्तरेतल्या राज्यांमध्ये वेगळीच क्रेझ आहे.
मुंबई : भोजपुरी चित्रपटाची उत्तरेतल्या राज्यांमध्ये वेगळीच क्रेझ आहे. अशाच एका भोजपुरी चित्रपटानं नवीन रेकॉर्ड बनवला आहे. भोजपुरी चित्रपट निरहुआ रिक्शावाला-2 या चित्रपटाला यूट्यूबवर ५० मिलियन म्हणजेच ५ कोटी लोकांनी पाहिलं आहे. कोणत्याही भोजपुरी चित्रपटानं एवढे हिट्स मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी निरहुआ हिंदुस्तानी या चित्रपटाला यूट्यूबवर ४ कोटी ६४ लाख म्हणजेच ४६ मिलियन व्ह्यू मिळाले होते.
२२ मे २०१५ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. सतिश जैन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. दिनेश लाल यादव, आम्रपाली दुबे, किरन राय आणि सत्य प्रकाश या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत होते.