`आम्ही उगाच नौटंकी...`, कार्तिक आर्यनने अजय देवगणला डिवचलं?, `आमच्या `भूल भुलैय्या 3` ला कॅमिओची गरज नाही`
Kartik Aaryan on Bhool Bhulaiya 3: आमचा आमच्या कथेवर विश्वास असल्याने आम्हाला कॅमिओची गरज नाही असं `भूल भुलैय्या 3` (Bhool Bhulaiyaa 3) साठी सज्ज असलेल्या कार्तिक आर्यनने (Kartik Aryan) म्हटलं आहे. महत्त्वाचं म्हणजे, सिंघम अगेन (Singham Again) चित्रपटात सलमान खान पाहुण्या भूमिकेत आहे.
Kartik Aaryan on Bhool Bhulaiya 3: दिवाळीच्या शुभमूहूर्तावर बॉक्स ऑफिसवर 'सिंघम अगेन' (Singham Again) आणि 'भूल भुलैय्या 3' (Bhool Bhulaiyaa 3) दोन्ही चित्रपट रिलीज होणार असून चांगलंच युद्ध रंगण्याची शक्यता आहे. अनीस बाजमी (Anees Bazmee) यांनी 'भूल भुलैय्या 3' तर रोहित शेट्टीने (Rohit Shetty) 'सिंघम अगेन' चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. सिंघम अगेन चित्रपटात कलाकारांची फौज असून दुसरीकडे भूल भुलैय्यामध्ये कार्तिकसह तृप्ती डिमरी, विद्या बालन आणि माधुरी दीक्षित दिसणार आहेत. 'झूम'ला दिलेल्या मुलाखतीत कार्तिक आर्यनने भुल भैलय्या चित्रपटात सिंघम अगेनप्रमाणे काही कॅमिओ आहेत का? यावर भाष्य केलं आहे.
कार्तिक आर्यन काय म्हणाला?
“भूल भुलैया चित्रपटात हा पूर्ण असून, जे आहात त्यामुळे तो संपूर्ण झाला आहे. आम्हाला कोणत्याही नौटंकीची गरज नाही. आम्हाला कथा आणि चित्रपटाबद्दल पूर्ण विश्वास आहे”, असं कार्तिक आर्यनने सांगितलं आहे. या चित्रपटात तृप्ती डिमरी, विद्या बालन, माधुरी दीक्षित, संजय मिश्रा, राजपाल यादव आणि विजय राज यांच्याही भूमिका आहेत.
या महिन्याच्या सुरुवातीला, पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत, कार्तिकने चुकून कियारा अडवाणीसोबत 'भूल भुलैय्या' 3 चा अत्यंत संरक्षित क्लायमॅक्स शूट केला असल्याचं सांगितलं. त्यामुळे 2022 च्या ब्लॉकबस्टर 'भूल भुलैया 2' मध्ये प्रमुख भूमिकेत असणारी कियारा पुन्हा एकदा चित्रपटात दिसेल अशी शक्यता व्यक्त होत आहे.
पण Galatta India ला दिलेल्या मुलाखतीत, कार्तिकने यावर स्पष्टीकरण दिलं. “अरे यार मी ते चुकून बोललो होतो. मी भूल भुलैय्या 3 बद्दल बोलत होतो. पण 2 ने गोंधळात टाकलं होतं. लोकांना वाटलं की मी एखादं गुपित उघड केलं आह. पण ती एक चूक होती.
दरम्यान कार्तिक आर्यनने केलेल्या विधानानंतर नेटकऱ्यांनी त्याने थेट सिंघम अगेन चित्रपटाला लक्ष्य केल्याची टीका केली आहे. रोहित शेट्टीने कॅमिओच्या माध्यमातून त्याचं पोलिस विश्व निर्माण केले आहे, मग तो सिंबा असो किंवा सूर्यवंशी. त्याने सिंघम अगेनसाठी मोठी स्टारकास्ट गोळा केली आहे, ज्यामध्ये अजय देवगण, करीना कपूर, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, अर्जुन कपूर आणि जॅकी श्रॉफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सलमान खानने चित्रपटासाठी कॅमिओ शूट केलं असल्यावरही शिक्कामोर्तब झालं आहे. तो दबंग फ्रँचायझीमधील चुलबुल पांडेची भूमिका साकारणार आहे.
'भूल भुलैय्या 3' आणि 'सिंघम अगेन' हे दोन्ही चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर या शुक्रवारी 1 नोव्हेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहेत.