कार्तिक आर्यनचा `भूल भुलैया 3` `या` दिवशी Netflix वर होणार रिलीज
कार्तिक आर्यनचा `भूल भुलैया 3` चित्रपट लवकरच ओटीटीवर रिलीज होणार आहे. कार्तिक आर्यन, विद्या बालन आणि माधुरी दीक्षित यांचा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर या दिवशी प्रदर्शित होणार आहे.
Bhool Bhulaiyaa 3 OTT Release Date: कार्तिक आर्यन, माधुरी दीक्षित आणि विद्या बालन यांचा सुपरहिट चित्रपट 'भूल भुलैया 3' ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर आता हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे. कार्तिक आर्यनने स्वत: एक व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली आहे. हा चित्रपट 27 डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.
नेटफ्लिक्सने बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा एक व्हिडीओ शेअर केले आहे. ज्यामध्ये 'भूल भुलैया 3' चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याची घोषणा करण्यात आलीये. हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, कार्तिक आर्यन त्याच्या मजेदार शैलीत येत आहे. रुह बाबा आणि मंजुलिकाचा चेहरा पाण्यासाठी सज्ज व्हा.
'भूल भुलैया 3' चा बॉक्स ऑफिसवर धमाका
अनीस बज्मी दिग्दर्शित 'भूल भुलैया 3' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठ्या प्रमाणात कमाई केली. 'भूल भुलैया 3' आणि अजय देवगनचा बहुप्रतिक्षित असणारा 'सिंघम अगेन' हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाले होते. अशा परिस्थितीत 'भूल भुलैया 3' बॉक्स ऑफिसवर 'सिंघम अगेन'ला टक्कर देऊ शकणार नाही म्हटले जात होते. मात्र, Sacknilk च्या रिपोर्टनुसार, या हॉरर कॉमेडी चित्रपटाने जगभरात 389.28 कोटी रुपयांचा व्यवसाय करून सर्वांना चकित केले.
'भूल भुलैया 3' सोबत रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंघम अगेन' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. 'भूल भुलैया 3' चित्रपटापेक्षा खूप बजेट आणि ॲक्शन चित्रपट असूनही अजय देवगनचा 'सिंघम अगेन' चित्रपट कार्तिक आर्यनच्या चित्रपटाला मागे टाकू शकला नाही. 'सिंघम अगेन' चित्रपटाने जगभरातून केवळ 372.4 कोटी रुपयांची कमाई केली.
'भूल भुलैया' चित्रपटाचे तिन्ही भाग हिट
'भूल भुलैया 3' हा बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'भूल भुलैया' चित्रपटाचा तिसरा भाग होता. त्याचा दुसरा भाग 'भूल भुलैया 2' हा चित्रपट 2022 मध्ये रिलीज झाला होता. या मालिकेतील चित्रपट नेहमीच प्रेक्षकांना आवडतात. त्याच्या तिसऱ्या भागातही असेच घडले. तथापि, मोठ्या संघर्षानंतरही, तिसऱ्या भागाने स्वतःला सिद्ध केले आणि चांगली कमाई केली.