मुंबई : 'भूतनाथ' हा चित्रपट 2008 साली आलेला असा एक चित्रपट होता, जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप आवडला होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी भूत बनून लोकांचे मनोरंजन केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमिताभ यांच्यासोबतच चित्रपटातील 'अमन'ची भूमिका साकारणारा बालकलाकार अमन सिद्दिकीची भूमिकाही लोकांना आवडली. चित्रपटात त्याला प्रेमाने 'बंकू' असेही संबोधले जात होते. चित्रपट प्रदर्शित होऊन 14 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे आणि आता अमन सिद्दीकीचा लूकही पूर्णपणे बदलला आहे.


समोर आलेल्या अमन सिद्दिकीच्या फोटोमध्ये तो एका सुंदर ठिकाणी भिंतीवर बसलेला दिसत आहे. यामध्ये त्याने जीन्स आणि टी-शर्ट घातलं आहे. यामध्ये अमन सिद्दीकी खूपच तरुण आणि देखणा दिसत आहे. हा फोटो पाहून अनेकांनी अभिनेत्याला ओळखण्यास नकार दिला आहे.  अशा परिस्थितीत त्याला ओळखणे खूप कठीण झाले आहेत. 



भूतनाथ या चित्रपटातील अमन आणि अमिताभ यांच्यातील केमिस्ट्री लोकांना आवडली. लोकांना विशेषतः अमनचा गोंडसपणा आवडला.


यानंतर भूतनाथ रिटर्न्सही आला, पण त्यात अमन सिद्दीकी दिसला नाही. त्यानंतर 2013 मध्ये अमन शिवालिक नावाच्या सिनेमात दिसला होता.भूतनाथमध्ये बंकूची भूमिका साकारून त्याला ओळख मिळाली ही आणखी एक गोष्ट आहे.