`अगं किती वेळ श्वास रोखून चालशील...` भुमी पेडणेकरच्या रॅम्प वॉकवर हेटर्सनं साधला निशाणा
Bhumi Pednekar Trolled: सध्या भुमी पेडणेकरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान गाजतो आहे. परंतु तिला यावेळी प्रचंड प्रमाणात ट्रोल करण्यात आलं आहे. नेमके ट्रोलर्सनं तिला काय सुनावलं आहे हे आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.
Bhumi Pednekar Trolled: सोशल मीडियावर अभिनेत्री या अनेकदा ट्रोल होताना दिसतात. त्यामुळे त्यांच्या खिल्ली एकानं उडवली की सगळेच उडवायला लागतात. खासकरून या अभिनेत्री त्यांच्या कपड्यांवरूनही अनेकदा ट्रोल होतात. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगतात. कपड्यांपेक्षा त्या ज्याप्रमाणे आपली स्टाईल फॉलो करतात त्यामुळेही त्यांना ट्रोलिंग सहन करावे लागते. आता फॅशन शोचं किंवा रॅम्पवॉकचंच उदाहरण घ्या ना. अभिनेत्री या कायमच यासाठी उत्साही असतात परंतु त्यांच्या रॅम्पवॉकमुळे त्यांना अनेकदा ट्रोल केले जाते. अशावेळी त्या अगदी पुर्ण आत्मविश्वासानं रॅम्पवॉक करताना दिसतात. परंतु ते राहतं बाजूला आणि त्यांना त्यांच्या वॉकवरून खूपच टोमणे खावे लागतात. आता भुमी पेडणेकरचंच उदाहरण घ्या ना. तिनं नुकताच एका रॅम्पवरून वॉक केला होता. त्यामुळे तिला सगळेचजण ट्रॉल करून लागले आहेत. परंतु नेमंक असं घडलंय तरी काय?
सध्या एका रॅम्पवॉकमध्ये भुमीनं फार सुंदर ड्रेस घातला होता. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगली होती. त्यातून तिचा ड्रेस हा फारच ओपन आणि फ्रंट कटवाला होता. तिचा गाऊन हा शिमर आणि फ्लोअरल डिझाईनचा होता. त्याचसोबत त्याचा रंग हा क्रिमी आणि लाईट ब्राऊन होता. ती या आऊटफीटमध्ये चांगलीच सुंदर दिसत होती. त्यामुळे तिची खूपच चर्चा रंगलेली होती. तिच्या चाहत्यांनीही तिच्या सौंदर्यांचे कौतुक केले होते. त्यातून तिच्या रॅम्पवॉकचेही कौतुक केले होते. परंतु काही हेटर्सना मात्र तिचा हा रॅम्पवॉक काहीच पचनी पडलेला नाही. त्यामुळे तिला प्रचंड प्रमाणात ट्रोल करण्यात आलं आहे.
काहींनी म्हटलंय की, ''आता किती वेळ श्वास रोखून ठेवशील?'' तर तिचा रॅम्प वॉक पाहून एकानं लिहिलंय की, ''काय हे हिच्यापेक्षा तर मी साधीही फार नीट चालू शकते.'' तर दुसऱ्या एकानं लिहिलंय की, ''साध्या सुसिक्षित आणि घरंदाज बायकाही हिच्यापेक्षा फार सुंदर चालतात.''
सध्या तिला ट्रोल केल्यामुळे तिची फारच चर्चा रंगली आहे. भुमी ही आपल्या हटके अभिनयासाठी ओळखली जाते. तिचे वडील ही महाराष्ट्राचे माजी मंत्री होती. तिची बहीणही आता बॉलिवूडमध्ये येण्यास सज्ज आहे. त्यातून तिचीही जोरदार चर्चा रंगलेली आहे. भुमी पेडणेकर आपल्या बोल्डनेसमुळेही ओळखली जाते. तिला अनेकदा ट्रोलही केले जाते. आता ती तिच्या या रॅम्पवॉकमुळेही फारच चर्चेत आली आहे. भुमीचा गोंविदा मेरा नाम हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. जो फार मोठ्या प्रमाणात गाजला होता. लस्ट स्टोरीजमध्येही ती दिसली होती.