मुंबई : बच्चन कुटूंब हे त्यांच्या मोठ्या मोठ्या सेलिब्रेशनसाठी ओळखले जातात. कधी त्यांची दिवाळी पार्टी तर कधी होळी पार्टी. मात्र, सगळ्यात जास्त चर्चेचा विषय ठरलेला कार्यक्रम म्हणजे अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रायचं लग्न. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यावेळी सोशल मीडिया नव्हतं, त्यामुळे अभिषेक आणि ऐश्वर्याच्या लग्नासाठी संपूर्ण देश तितकंच उत्सुक होतं. एवढंच काय तर त्यांच लग्न टेलिकास्ट करण्यासाठी अमिताभ यांनी कोटींची रक्कम घेतल्याचे म्हटले जाते. 'हिंदुस्तान टाइम्स’ नं दिलेल्या एका वृत्तानुसार जया बच्चन यांनी एका मुलाखतीत या विषयी सांगितलं होतं. 'अभिषेकचं जेव्हा लग्नं झालं तेव्हा आम्ही ऐश्वर्याला घेऊन गृहप्रवेशासाठी घेऊन येत होतो. ऐश्वर्या गाडीत बसली होती आणि खुद्द अमिताभ गाडी चालवत होते. आम्ही पत्रकार बांधवांना फोटोज काढता यावे यासाठी खास जागादेखील ठेवली होती, पण त्यांना ती सोय काही आवडली नव्हती. अशातच एका व्यक्तीनं गाडीसमोर उडी मारली, अमिताभ यांनी सांभाळून घेतलं नाहीतर काही खरं नव्हतं. तेव्हा मात्र अमिताभ बच्चन चांगलेच संतापले. आमच्या सुरक्षा रक्षकांनी परिस्थिती हाताळली.'


या प्रकरणानंतर अमिताभ बच्चन यांच्यावर चांगलीच टीका झाली. याविषयी बोलताना जया म्हणाल्या, 'त्याचदिवशी संध्याकाळी पत्रकारांनी यांच्या घरावर मोर्चा काढला आणि दगडफेकदेखील केली. लोकांनी आमच्यावर खूप टीका केली.' (Big B Lost His Cool While Taking Aishwarya To The Home After Wedding) 



ऐश्वर्या आणि अभिषेक ‘धूम 2’ च्या शूटिंगदरम्यान जवळ आले आणि 2007 मध्ये ते लग्नबंधनात अडकले. बच्चन यांच्या जुहू येथील ‘प्रतीक्षा’ बंगल्यावर त्यांनी सप्तपदी घेतल्या.