मुंबई : बिग बी हे लहानापासून मोठ्यापर्यंत साऱ्यांचेच खास आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

म्हणून त्यांची एक झलक पाहण्यासाठी  रविवारी असंख्य चाहते 'जलसा' समोर येतात. बिग बी याला ‘संडे दर्शन’ म्हणतात. मुंबईत असले की, दर रविवारी चाहत्यांना अभिवादन करायला बिग बी बाहेर येतात. हात हलवून चाहत्यांना अभिवादन करतात, त्यांचे आभार मानतात. गेल्या कित्येक वर्षांपासून हे सुरू आहे. या रविवारीही ‘जलसा’ बाहेर हेच चित्र दिसले. आणि ही खास आठवण बिग बी यांनी ट्विटरवर शेअर केली आहे. 


अमिताभ यांची  एका चिमुकल्या चाहतीशी भेट घालून दिली. अमिताभ यांनी आपल्या सोशल अकाऊंटवर या चिमुकल्या चाहतीचे फोटो शेअर केले आहेत. ‘जलसा’बाहेर जमलेल्या शेकडोंच्या गर्दीतून ही चाहती आत आली. केवळ अमिताभ यांच्याशी हस्तांदोलन करावे, अशी तिची छोटीशी इच्छा होती. 


 अमिताभ अभिवादन करण्यासाठी बंगल्याबाहेर आलेत आणि ‘जलसा’चे दरवाजे उघडले गेलेत. याचक्षणाला ही चिमुकली चाहती गर्दीतून आत आली आणि अमिताभ यांच्या पुढ्यात उभी झाली.  तिने अमिताभ यांना हात हलवून अभिवादन केले. मग काय, अमिताभ यांनी लगेच या चिमुकलीला  जवळ बोलवले आणि तिचे लाडकौतुक केले. अमिताभ यांनी हा फोटो शेअर केला आहे. 



या क्षणाचे  काही फोटो अमिताभ यांनी शेअर केले आहेत. ‘छोटीशी चिमुकली गर्दीतून अचानक गेटच्या आत आली. केवळ माझ्याशी हात मिळवण्यासाठी. अतिशय सुंदर...’ असे त्यांनी हे फोटो शेअर करताना लिहिले आहे.