मुंबई: 'बिग बॉस' चा एक सिझन संपला की त्याच्या दुसऱ्या सिझन बद्दल चर्चा सुरू होत असते. बिग बॉसचा अकरावा हंगाम आज १ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. यामधील स्पर्धक कोण असतील याची माहिती सर्वांपर्यंत पोहोचली आहे. तरीही बिग बॉसच्या घरात काय घडेल याबद्दल चाहत्यांना नेहमीच उत्सुकता आहे. काय काम असेल, स्पर्धक कसे वागतील? अशा चर्चा एव्हाना सुरू झाल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिग बॉसच्या ११ व्या हंगामात, 'भाभीजी जी घरपे है'  या प्रसिद्ध मालिकेतील भाभी म्हणजेच शिल्पा शिंदेदेखील दिसणार आहेत. कलर्स टिव्हीतर्फे इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ टाकण्यात आला आहे.



यामध्ये शोचे चित्रीकरण शेअर केले आहे. सलमान खान शिल्पाला एक छोटेसे काम देतो आणि शिल्पालाही त कामगिरी निभावते.  सलमान खान शिल्पासाठी शायरी करतो. त्याचे उत्तर देताना अंगूरी भाभी म्हणते, 'सही पकडे है |'