Ankita Lokhande Vicky Jain: 'बिग बॉस 17' सध्या चांगलंच चर्चेत  आहे. रोज काही ना काही वेगळं आपल्याला पाहायला मिळतं. यावेळी शोमध्ये छोट्या पडद्यावरील सगळ्यांची लाडकी अभिनेत्री अंकिता लोखंडे ही पती विकी जैनसोबत दिसली. या शोमध्ये येण्याआधी त्यांच्यातील एक मजेशीर बाजूच प्रेक्षकांनी पाहिली होती. तर शोमध्ये आल्यानंतर त्या दोघांमध्ये अनेक वाद सुरु झाले. त्यांच्यात अनेकदा भांडण झाल्याचं आपण पाहिलं. सध्या त्यांचा असाच एक व्हिडीओ सध्या समोर येतोय. या व्हिडीओत ते दोघं भांडताना दिसत आहेत. तर अंकिता विकीला म्हणते की 'तू माझा वापर केला आहेस'. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिग बॉसचा शो हा अत्यंत लोकप्रिय असतो परंतु यावेळी या घरात बराच मोठा ड्रामा पाहायला मिळतो आहे. त्यामुळे या शोची विशेष चर्चा आहे. सलमान खान हा शो होस्ट करतो आहे परंतु त्यालाही प्रचंड ट्रोल करण्यात येते आहे. याच शोमध्ये दोन स्पर्धकांना एकत्र बेडरूममध्ये एकाच बेड कीस करतानाही दाखवण्यात आले होते हे पाहून नेटकऱ्यांचा पारा बराच चढला होता. आता विकी जैन आणि अंकिता लोखंडेचं भांडणं पाहून नेटकऱ्यांमध्ये नाना तऱ्हेच्या चर्चा रंगल्या आहेत. यावेळी या शोचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात अंकिता लोखंडे ही विकी जैनवर नाना तऱ्हेचे आरोप लावताना दिसते आहे. त्यामुळे तिची जोरात चर्चा आहे. 


''तू स्वार्थी आणि मूर्ख आहेस. तुझ्याबरोबर राहून माझं डोकं फिरलं आहे. आपलं लग्न झालंय हे विसरून जा. आजपासून तू आणि मी वेगळे आहोत. तू पहिल्यापासून असाच होतास. तू माझा वापर केला आहेस'', असं यावेळी ती या व्हिडीओतून सांगताना दिसते आहे. त्यामुळे तिची विशेष चर्चा रंगलेली आहे. 


 


बिग बॉस सुरू झाल्यापासून त्यांच्यात अनेक वाद सुरू झाले आहेत. अनेक अकिंता लोखंडे हिनं आपल्या जुन्या रिलेशनशिपच्या आठवणीही जाग्या केल्या आहेत. सुशांत सिंह राजपूतचीही तिनं आठवण काढली आहे. "द खबरी'' या ट्विटर अकांटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. सध्या या व्हिडीओची सर्वत्र जोरात चर्चाही रंगलेली पाहायला मिळते आहे. सध्या या शोमध्ये विकी जैनही बराच मलोड्रामा करताना दिसतो आहे. सोबतच अनेक छक्के पंजे खेळतानाही तो दिसतो आहे. त्याचसोबत यावेळी बराच हायव्होलटेज ड्रामाही पाहायला मिळतो आहे. त्यातून भांडणं, राडे यांचा पुरेपुर मसालाही यात भरलेला आहे.